दिग्गज नेते आणि गांधी घराण्याचे विश्वासू, खासदार अहमद पटेल यांचं निधन झालंय. आज पहाटे 3.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरे...
दिग्गज नेते आणि गांधी घराण्याचे विश्वासू, खासदार अहमद पटेल यांचं निधन झालंय. आज पहाटे 3.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सार्वजनिक आयुष्यात त्यांनी अनेक वर्ष समाजाची सेवा केली. त्यांच्या तल्लख बुद्धीमत्तेसाठी तसंच पक्षाला बळकटी देण्यासाठी काँग्रेस पक्ष त्यांना नेहमीच स्मरणात ठेवेल, अशा शब्दात मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
‘अहमद पटेल यांच्या निधनाने मी दु:खी झालोय. अहमद पटेल यांनी त्यांच्या सार्वजनिक आयुष्यात अनेक वर्ष समाजाची सेवा केली. काँग्रेसमधील त्यांची भूमिका, पक्षासाठी त्यांचं योगदान काँग्रेस नेहमी स्मरणात ठेवेल. त्यांचा मुलगा फैजलशी बोलून भावना व्यक्त केला. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो’, असं मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.