Breaking News

आ.निलेश लंके यांच्या संपूर्ण वर्षाचा लेखाजोखा असणाऱ्या वेबसाईटचे सुप्रिया सुळे यांच्या हस्ते मुंबईत शुभारंभ.

.निलेश लंके यांच्या संपूर्ण वर्षाचा लेखाजोखा असणाऱ्या वेबसाईटचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते मुंबईत शुभारंभ.
----------------
महाराष्ट्रात नावलौकीक मिळविणारा आ.निलेश लंके यांचे रूपाने मला भाऊ मीळाला - खा.सुप्रिया सुळे


पारनेर प्रतिनिधी- आमदार निलेश लंके यांच्या वर्षपूर्ती सोहळ्या निमित्ताने संपूर्ण वर्षाचा लेखाजोखा असणाऱ्या वेबसाईटचे संसद रत्न,खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. mlanileshlanke.com या संकेतस्थळावर जाऊन मतदार संघातील व संघा बाहेरील कुठलाही मतदार व इतर कुठलीही व्यक्तीला एक वर्षातील सर्व राजकीय-सामाजिक,शैक्षणिक व इतर कामाचा लेखाजोखा पाहता येणार आहे.अशी माहिती आमदार निलेश लंके यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांना दिली.यावेळी आ.निलेश लंके, तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांच्या सार्वभौम सामाजिक कार्याचा देशाचे नेते शरद पवार,पालक मंत्री हसनजी मुश्रीफ, ना.छगन भुजबळ यांनी या आनोख्या कार्याचा गौरव करत त्यांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.व महाराष्ट्रात तांत्रिक क्षेत्रात अनोखे योगदान देणाऱ्या या तंत्रस्नेहींना महाराष्ट्रात ओळख निर्माण करून देणार असे आश्वासित केले .


आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेले अकोळनेर डिजिटल ग्राम या संकल्पनेतून तंत्रस्नेही संदीपजी गुंड यांनी देशातील हायटेक शाळा बनविण्याचा प्रयास वेबसाईट द्वारे सुप्रियाताईंना दाखविला व या आशयाच्या शाळा संपूर्ण महाराष्ट्रात करण्याचा मानस आहे असे पारनेर नगरचे आमदार निलेश लंके यांना खासदार सुप्रियाताई सुळे यांना सांगितले केले.
पारनेर नगर विधानसभा मतदार संघात आमदार आपल्या दारी या नावाने ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर लवकरच जनतेच्या सेवेत देत असल्याचे व त्याची तयारी पूर्णत्वास आली आहे असे आमदार लंके यांनी सुप्रियाताई सुळे यांना सांगितले.
शुभारंभ झालेल्या वेबसाईटची निर्मिती दीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप गुंड यांच्या टीमने केले आहे.आमदार निलेश लंके आमदार झाल्या नंतरच्या सर्व योजना,विकास कामे,सामाजिक व शैक्षणिक कार्य, कोरोना संसर्गामुळे लॉक डाऊन मध्ये केलेले सामाजिक शैक्षणीक कार्य, ऑनलाईन शाळा , पोलीस अॅकेडमी,कोविड केअर सेंटर मधून हजारो रुग्णांना वैद्यकीय सेवा देऊन महाराष्ट्रात ओळख निर्माण करणाऱ्या आमदारांचा संपूर्ण लेखाजोख्याचे बुधवारी मुंबईत यशवंतराव चव्हाण सभाग्रहात खा.सुप्रीया सुळे यांच्या हस्ते या वेब साईटचे लोकार्पण करण्यात आले.
शुभारंभ प्रसंगी ना.दत्तामामा भरणे,आमदार निलेश लंके,आमदार डॉ. किरण लहामटे,दत्ता बाळसराफ यांचे समवेत महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष जितेश सरडे,तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड,गटविकास अधिकारी किशोर माने ,वनकुटे गावचे सरपंच ॲड.राहुल झावरे, बाळासाहेब खिलारी,संदीप चौधरी, प्रसार माध्यम प्रमुख श्रीकांत चौरे,नितीनशेठ चिकणे बाळासाहेब लंके,संदीप ठाणगे,संभाजी वाळूंज, कांतीलाल भोसले यांच्या सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या वेबसाईटचा लोकार्पण संपन्न झाला.