- वीजबिलांचा शॉक : मनसेचा विविध ठिकाणी गुरूवारी महामोर्चा मुंबई/प्रतिनिधी वाढीव वीजदराबद्दल राज्य सरकारला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत अ...
- वीजबिलांचा शॉक : मनसेचा विविध ठिकाणी गुरूवारी महामोर्चा
मुंबई/प्रतिनिधी
वाढीव वीजदराबद्दल राज्य सरकारला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत अल्टीमेटम देण्यात आला होता. पण अल्टीमेटम संपतानाही राज्य सरकारकडून कोणताच निर्णय होत नसल्याने अखेर मनसेने मुंबई, ठाणे, रायगड याठिकाणी महामोर्चाची घोषणा केली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नेते व कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरण्याचे आदेश दिले आहेत. गुरूवारी, 26 नोव्हेंबर रोजी वाढीव वीज बिलाबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी मोर्चे आयोजित केले आहेत. मनसेकडून याआधीच निवेदन, अर्ज, विनवण्या करण्यात आल्या होत्या. पण राज्य सरकारने अपेक्षाभंग केला असल्याचे मनसेने म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून काही अपेक्षा नसल्याने रविवारच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने अपेक्षाभंग झालेला नाही. आपला मुख्यमंत्री, आपले नशीब, आपले दुर्दैव, आपली जबाबदारी अशा आशयाचे ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल, असा इशारा मनसेमार्फत देण्यात आला होता. लाथो के भूत बातों से नही मानते असेही आपल्या ट्विटमध्ये संदीप देशपांडे यांनी नमुद केले होते. राज्य सरकारकडे अनेकवेळा पाठपुरावा करूनही विजेच्या विषयावर कोणताही दिलासा सरकारकडून मिळाला नाही. म्हणूनच मनसेने थेट आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणेसह राज्यात विविध ठिकाणी हे आंदोलन होणार आहे.
------------------------