Breaking News

तर भारतीय जनता पार्टीचा 'बी' पण उरणार नाही

 

भारतीय जनता पार्टीचा 'बी' पण उरणार नाही असे काम महाविकास आघाडी सरकार करेन! - धनंजय मुंडे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज पुन्हा एकदा भरतोय जनता पार्टीवर शरसंधान साधले आहे. भाजपाल सध्या राज्यात करत असलेले राजकारण हे दुर्दैवी आहे. पण राज्यात भाजपचे 'बी' पण उरणार नाही असे काम महाविकास आघाडीचे सरकार येणाऱ्या काळात करेन, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

एकीकडे विरोधक टीका करत असताना दुसरीकडे आपल्या कार्यकाळात काय झाले याचा विसर त्यांना पडला आहे. मराठवाडा पदवीधर उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

महाविकास आघाडीचे सरकार आता राज्यात आहे आणि ते राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी काम करीत आहे. मात्र विरोधक टीका करण्यात मग्न आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी काय केले हेही त्यांनी पाहिले पाहिजे, असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला.

आता वीज बिलाबद्दल बोलत असताना त्यांनी थकीत बिलाचा डोंगर किती केला हे पाहिले पाहिजे. मी कुणाच्या डिग्री वर बोलणार नाही असे म्हणत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. तसेकंग भारतीय जनता पार्टीचे बी पण उरणार नाही असे काम महाविकास आघाडीचे सरकार राज्यात करेन, असेही ते म्हणाले.

यावेळी आपल्याला महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे प्रतिपादन धनंजय मुंडे यांनी यावेळी केले आहे.