Breaking News

वाको इंडियासाठी हा अभिमानाचा क्षण खेळाडू'ची १२ पदकांची कमाई !

वाको इंडियासाठी हा अभिमानाचा क्षण खेळाडू'ची १२ पदकांची कमाई !


पारनेर प्रतिनिधी :
    वाको (आयएफ) आयोजित विविध प्रकारात आयोजित "यूटीएस वर्ल्ड व्हर्च्युअल युवा क्रीडा महोत्सव २०२०" साठीच्या पहिल्या "आंतरराष्ट्रीय व्हर्च्यूअल क्वालिफिकेशन  स्पर्धेमध्ये"  १२ पदके जिंकल्याबद्दल वाको महाराष्ट्र अध्यक्ष, सर्व खेळाडू, सर्व प्रशिक्षकांचे अभिनंदन. ३ सुवर्णां पदकांसह  , ३ रौप्य पदक तर ६ कांस्य पदकांची लयलूट केली.
    विजेते पुढीलप्रमाणे शौर्य मुंडपत- सुवर्ण, वेल्मा रेमेडीयो- सुवर्ण, अक्षय महाजन - सुवर्ण, धैर्य अहिरे - रौप्य, शौर्य शेळके - रौप्य, राहुल खुबट्या - रौप्य, मयुरेश चौघुले - कांस्य, मयूर साळगावकर - कांस्य, सूरज शिंदे - कांस्य, एग्रीमा देवळाल - कांस्य, श्रावणी देशमुख - कांस्य, प्रीती पाटील - कांस्य, सनावी चौधरी -४ क्रमांक, भरघवी मोहिते- ५ क्रमांक, समीक्षा मांजरमे- ५ क्रमांक
वाको इंडियाचे अध्यक्ष  संतोष के. अग्रवाल आणि वाको महाराष्ट्रचे अध्यक्ष निलेश शेलार यांनी सर्व विजेत्यांना आणि ज्यांचे निरंतर प्रामाणिक प्रयत्न यशस्वी ठरले आहेत अशा सर्वांचे अभिनंदन केले. प्रशिक्षकांचे अभिनंदन सूर्यप्रकाश मुंडपत सर, धीरज वाघमारे, अनिल मिरकर सर, राजेश्वरी कोठावळे, आशिष राणे आपल्या मार्गदर्शना शिवाय हे शक्य नव्हते.