जामखेड प्रतिनिधी : आरक्षित जागेमुळे अनेक मातब्बरांची संधी हुकली आहे. तर अनेकांना आयती संधी मिळाली. तर काहींनी आरक्षणाचे दाखले काढून ठेवले ...
जामखेड प्रतिनिधी :
आरक्षित जागेमुळे अनेक मातब्बरांची संधी हुकली आहे. तर अनेकांना आयती संधी मिळाली. तर काहींनी आरक्षणाचे दाखले काढून ठेवले तर काही लोक जातीच्या समीकरणाचे अनोखे फंडे वापरण्याचा विचार करत आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जामखेड नगरपरिषदेचा प्रभाग रचना व आरक्षण कार्यक्रम सूरू आहे त्या अनुषंगाने दि २७ नोव्हें. रोजी प्रांताधिकारी आर्चना नष्टे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, यांनी २०२१ च्या नगरपरिषद निवडणुकीसाठी २१ प्रभागांचे आरक्षण जाहीर केले. यावेळी नगर अभियंता अनंत शेळके, अविनाश साबळे, अतुल राळेभात, लक्ष्मण माने, ज्ञानेश्वर ओव्हळ, आदी नगरपरिषद आधिकारी उपस्थित होते.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी प्रभाग क्रमांक ६,२०,२१ आरक्षित करण्यात आले तर व अनुचित जातीचा मागास प्रवर्ग महिलासाठी प्रभाग क्रमांक ८ तर अनुसूचित जातीच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक १४ आरक्षित. व
सर्वसाधारण महिलांसाठी प्रभाग क्रमांक १३,२,१०,१८,१९,७,५. हे सात प्रभाग आरक्षित करण्यात आले आहे. तर सर्वसाधारण व्यक्तींसाठी प्रभाग क्रमांक ९,१२,१६,१,११,३ हे सहा प्रभाग आरक्षित. तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्तींसाठी प्रभाग क्रमांक ४,१५,१७ हे तीन प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत.
अशा प्रकारे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.ऐन थंडीत जामखेड मध्ये राजकीय वातावरण गरम होत आहे.
नेहमीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप आमनेसामने येणार असल्याची चर्चा आहे .वंचित बहुजन आघाडी व एमआयएम, आम आदमी पार्टी सक्रिय होतांना दिसत आहे. मात्र काँग्रेस व शिवसेना आद्यप सक्रिय दिसत नाही. तिसरा पर्याय म्हणून नगरपरिषद निवडणुकीत तिसरी आघाडी स्थापन होणार का? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.