शिवसेना नेत्याचा राज ठाकरे यांच्या मनसेवर अत्यंत गंभीर आरोप वेगवेगळ्या पक्षांची सुपारी घेऊन झाली. आता ज्या भाजपच्या नेत्यांना लोकसभा निवड...
शिवसेना नेत्याचा राज ठाकरे यांच्या मनसेवर अत्यंत गंभीर आरोप
वेगवेगळ्या पक्षांची सुपारी घेऊन झाली. आता ज्या भाजपच्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीत लाव रे तो व्हिडिओ म्हणून उघडे नागडे केले. आता त्याच नागड्याबरोबर उघडा झोपला तर काय परिस्थिती होते ते कदाचित पुढे दिसेल असं म्हणत परब यांनी मनसेची खिल्लीही उडवली.
मुंबई : मनसे भाजपबरोबर जाणार ही बदलत्या राजकारणाची नांदी आहे की नाही हे मला माहित नाही. मात्र, मनसे सुपारी घेतल्याशिवाय काम करू शकत नाही असे म्हणत मनसे(MNS) हा सुपारीवर चालणारा पक्ष असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना(shivsena) नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब(anil parab) यांनी केला आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत राज ठाकरे(raj thackeray) यांचा मनसे पक्ष भाजपबरोबर युती करणार असल्याची चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने मनसेवर गंभीर आरोप केले आहेत. मनसेला कुणाची तरी सुपारी घ्यावीच लागेल. त्यांच्या पक्षाचं अस्तित्वच त्याच्यावर असा गंभीर आरोप परब यांनी केला आहे.
वेगवेगळ्या पक्षांची सुपारी घेऊन झाली. आता ज्या भाजपच्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीत लाव रे तो व्हिडिओ म्हणून उघडे नागडे केले. आता त्याच नागड्याबरोबर उघडा झोपला तर काय परिस्थिती होते ते कदाचित पुढे दिसेल असं म्हणत परब यांनी मनसेची खिल्लीही उडवली.
मुंबई महापालिका निवडणुकीला आम्ही समर्थपणे समारे जाऊ. आम्ही निवडणुकी जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिकेची नुवडणुक स्वबळावर लढायची की एकत्रीत याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील असे परब यांनी स्पष्ट केले.
मुंबईत शिवसेनेला निवडणुकीची वेगळी तयारी करावी लागत नाहीत. आम्ही नेहमीच हे काम करत असतो. शिवसेना हा पक्ष निवडणुकांसाठी जन्माला आलेला पक्ष नाही. 365 दिवस काम करणारा हा पक्ष आहे, असं सांगत अनिल परब यांनी भाजपलाही टोला लगावला आहे.