Breaking News

राजेश्वरी कोठावळे यांनी साजरी केली पोलिस बांधावा सोबत भाऊबीज

राजेश्वरी कोठावळे यांनी साजरी केली पोलिस बांधावा सोबत भाऊबीज
-------------
पारनेरचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांची उपस्थिती
------------
युवतींची रक्षणाची जबाबदारी घेत अडचणीच्या वेळेस संपर्क करण्याची पोलीस निरीक्षक बळप यांचे आवाहनपारनेर/प्रतिनिधी : 
   बहिण-भावाचा पवित्र सण म्हणजेच भाऊबीज मात्र सदैव 'ऑन ड्युटी' असलेल्या आपल्या बांधवांना आपले सण उत्सव साजरे करता येत नाही. 
सोमवारी दि. १६ भाऊबीज सणाचे औचित्य साधून पारनेर येथील महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या किक बॉक्सिंग प्रशिक्षक श्री. हॉरीझॉन स्पोर्ट्स अँड मार्शल आर्ट्स असो. महाराष्ट्र अध्यक्षा राजेश्वरी कोठावळे यांनी आपल्या सहकारी युवती प्राजक्ता गाडगे, पल्लवी औटी, मयुरी झरेकर, सानिया शेख, मुस्कान सय्यद, आदिती देवकर, शिवानी कावरे, यांच्या सोबत पारनेर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पारनेरचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक घनश्याम बळप आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांना भाऊबीज निमित्त ओवाळणी करून बहिण-भावाचा अतूट नाते असलेला हा सण त्यांच्या सोबत साजरा केला. 


 यावेळी महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या राजेश्वरी कोठावळे यांना पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी महिलांच्या विविध प्रश्नांवर काम करत असताना आमचे आपणांस पूर्ण सहकार्य राहील असे सांगितले.  तसेच तुम्हा सर्व युवतींची रक्षणाची जबाबदारी घेत अडचणीच्या वेळेस तत्काळ संपर्क साधण्याचे आव्हान केले. 
   यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघ, पोलिस उपनिरीक्षक पद्मने, सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक रोकडे, पोलिस हवालदार अशोक निकम, पोलिस हवलदार दगडू उजगरे, पोलिस कॉ्स्टेबल भालचंद्र दिवटे, सत्यम शिंदे, सुमित अधात, राम मोरे, सचिन लोळगे, आप्पा डमाले, दत्ता चौघुले, शाम गुजर, साहिल सय्यद, आदी पोलिस कर्मचारी उपस्थित होते.