Breaking News

किन्ही , करंदी , बहिरोबावाडी परिसरात बिबट्याचा वावर नागरिकांमध्ये प्रचंड घबराट

किन्ही , करंदी , बहिरोबावाडी परिसरात बिबट्याचा वावर नागरिकांमध्ये प्रचंड घबराट 
---------
शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांची वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी !
---------
तालुक्यात अनेक भागांमध्ये दिवसाढवळ्या बिबटया चा मुक्त संचार नागरिक हैराण.


पारनेर प्रतिनिधी -  
तालुक्यातील किन्ही , करंदी , बहिरोबावाडी या तिन्ही गावंमध्ये बिबट्याचा मुक्त वावर असुन आतापर्यंत या बिबट्याने शेळ्या , कोंबड्या , कुञे व हरणे मोठ्या प्रमाणावर फस्त केलेले असल्याने  या तिन्ही गावातील नागरिकांमध्ये चिंतेचे व घबाराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
गेली तिन , चार महिन्यांपासून करंदी गावातील उंबरशेत परिसरात दोन बछड्यांसह बिबट्या मादिचा मुक्काम असुन , बिबट्याच्या बछड्यांचा वावरतानाचा एक व्हिडिओ देखील नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता.  या परिसरात वनविभागाने पिंजरा लावूनही बिबट्या पिंजऱ्यात जात नाही.तसेच पिंजरा लावल्याने बिबट्या किन्ही , बहिरोबावाडी भागात मुक्तपणे संचार करू लागला असुन , आतापर्यंत अनेकांना बिबट्याचे दर्शन झालेले आहे.किन्ही येथील पोलस्तवस्तीवर गेल्या पंधरवड्यात अनेकदा बिबट्या भक्ष्याच्या शोधार्थ आल्याचे तेथील रहिवासी युवक नितीन खोडदे यांनी सांगितले आहे.राञीच्यावेळी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावं लागतं असल्याने व लहान , लहान मुले हि शाळा बंद असल्याने बहुधा घराबाहेर फिरत असल्याने बिबट्यापासुन नागरिकांच्या व लहान मुलांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांनी सोमवारी वनविभागाच्या तालुका वनसंरक्षक अधिकारी श्रीमती सिमा गोरे यांच्याकडे किन्ही येथील पोलस्तवस्ती परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली असून , वनविभागाने अप्रिय घटना घडण्याची वाट पाहु नये , असेही त्यांनी म्हटले आहे . यावर वनविभागाने देखील पिंजरा लावण्यासाठी अनुकूलता दर्शविली असल्याचे देठे पाटील यांनी सांगितले आहे.