$type=ticker$snippet=hide$cate=0

पुण्यात चार दिवस मद्यविक्री बंद

  पुणे : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यात येत्या रविवारपासून चार दिवस मद्यविक्री, परमिट रूम आणि बार बंद ...

 


पुणे : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यात येत्या रविवारपासून चार दिवस मद्यविक्री, परमिट रूम आणि बार बंद असणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

या आदेशानुसार पुणे शहरात 29, 30 नोव्हेंबर तसेच 1 आणि 3 डिसेंबरला ड्राय डे असणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकार्‍यांनी ड्राय डे बाबत आदेश दिले आहेत. मतदानाच्या 48 तास अगोदर म्हणजेच 29 नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजल्यानंतर मद्याची दुकाने आणि बार बंद राहतील, तर 1 डिसेंबरला मतदान असून सायंकाळी पाच वाजता मतदान संपल्यानंतर ती उघडतील. त्यानंतर 3 डिसेंबरला मतमोजणी आहे. त्यादिवशी पोलिस ठाण्यांच्या हद्दीमधील दुकाने आणि बार बंद राहतील. दरम्यान, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार प्रचारमोहीम राबवल्या आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत यंदाच्या पदवीधर निवडणुकीत पाहायला मिळत आहे.

पुण्यात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक यंत्रणेने मोठी खबरदारी घेतलेली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्रांवर वैद्यकीय अधिकार्‍यांची नेमणूक केली जाणार आहे. कुठल्याही निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच वैद्यकीय अधिकारी मतदान केंद्रावर असणार आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात एक डिसेंबरला राज्यातील तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे. महत्वाची बाब म्हणजे मतदानाच्या एक-दोन दिवस आधी मतदान पॉझिटिव्ह आला, तरीही त्याला मतदान करता येणार आहे. मतदानाच्या दिवशी शेवटच्या एका तासात पॉझिटिव्ह व्यक्तीला मतदान करता येणार आहे. तसेच मतदान केंद्रांवर पीपीई कीट, सॅनिटायझर, औषध-गोळ्यांची सोय केली जाणार आहे.

कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड, भाजपचे संग्रामसिंह देशमुख आणि मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोन पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या मतदारसंघात एकूण 62 उमेदवार रिंगणात आहेत. या वेळी मनसेने पदवीधर निवडणुकीत उडी घेतल्याने मतविभाजनाचा फटका टाळण्याचे आव्हान आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघात सुमारे साडेपाच लाख मतदार असून त्यात सर्वाधिक मतदारांची संख्या पुण्यात आहे. त्याखालोखाल सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूरमध्ये मतदार आहेत. मागच्या पदवीधर निवडणुकीत पंधरा टक्के मतदान झाले. या वेळी मतदारांची संख्या वाढल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.

Name

] ब्रेकिंग,844,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5534,letest News,582,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,1,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9939,औरंगाबाद,354,क्रीडा,675,दखल,657,देश,4142,नाशिक,773,पुणे,583,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15308,ब्रेकिंग न्युज,110,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12389,महाराष्ट्र सातारा,6,मुंबई,3428,विदेश,635,संपादकीय,1458,सातारा,3146,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: पुण्यात चार दिवस मद्यविक्री बंद
पुण्यात चार दिवस मद्यविक्री बंद
https://d282wbz2keffpz.cloudfront.net/wp-content/uploads/2020/05/03163943/Alcohol-Beer-Liquor-2.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_470.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_470.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content