अकोले प्रतिनिधी ः अकोले तालुका हा आदिवासी, दुर्गम व डोंगराळ असून खेडोपाड्यांनी विखुरलेला आहे. करोनाच्या काळामध्ये गेल्या 8 ते 9 महिन्यापासू...
अकोले प्रतिनिधी ः अकोले तालुका हा आदिवासी, दुर्गम व डोंगराळ असून खेडोपाड्यांनी विखुरलेला आहे. करोनाच्या काळामध्ये गेल्या 8 ते 9 महिन्यापासून कोणत्याही प्रकारचा रोजगार अगर काम धंदा उपलब्ध नाही.लोकांच्या हातात कोणत्याही प्रकारचे चलन उपलब्ध नसल्याने कौटुंबिक अडचण निर्माण झालेली आहे. शेतकर्यांच्या शेतातील धान्यांचे उत्पादन सध्या निघालेले आहे. हे धान्य खरेदी करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळातर्फे खरेदी केंद्र सुरु करावे, अशी मागणी माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केली.
आदिवासी भागातील नागरिक धान्य हे विक्रीच्या शोधात आहे. त्यांना जवळ बाजारपेठ उपलब्ध नाही, दळणवळणाची साधने उपलब्धनाहीत. त्यामुळे तालुक्यातील आदिवासी नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचण निर्माण झालेली आहे. अकोले तालुक्यातील आदिवासी नागरिकांची अडचण लक्षात घेता आदिवासी विकास महामंडळामार्फत धान्य खरेदी केंद्रे तातडीने सुरु करणे गरजेचे आहे. आदिवासी विभाग, नाशिकचे अप्पर आयुक्त व एकात्मिक आदिवासी विकास, राजूरचे प्रकल्प अधिकारी यांना दिलेल्या पत्रामध्ये पिचड यांनी मागणी केली आहे.
--------------------