कोजागिरी पोर्णिमेचा आनेवाडी टोलनाक्यावरील राडा प्रकरणी सातारा / प्रतिनिधी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची दुरावस्था झालेली अ...
कोजागिरी पोर्णिमेचा आनेवाडी टोलनाक्यावरील राडा प्रकरणी
सातारा / प्रतिनिधी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची दुरावस्था झालेली असताना आणि आवश्यक सोयीसुविधा मिळत नाहीत. तरीही आनेवाडी टोलनाक्यावर टोल वसुली होत आहे. या कारणामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच रिलायन्स इन्फ्राविरोधात टोल विरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या. टोल वसुली बंद पाडण्याचा प्रयत्न करत त्यांनी निदर्शने केली म्हणून गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह 16 जण वाई न्यायालयात आज हजेर झाले होते.
कोजागिरी पोर्णिमेच्या दिवशी आनेवाडी टोलनाक्याचे व्यवस्थापन खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकाकडे आहे. हे व्यवस्थापन आपल्याकडे घेण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रयत्नशील होते. टोलनाक्याचे व्यवस्थापन हस्तांतरावरुन आणि ताब्यावरून उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यामध्ये वाद होता. या वादातून 18 डिसेंबर, 2019 रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत आनेवाडी टोल नाक्यावर सर्थकांसह आंदोलन केले. यावरून भुईज पोलस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
टोलनाक्यावर सातारा बाजूकडून विरामाडे गावाकडे टोलनाक्याचे लेन क्रमांक एकच्या बाजूस कठड्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांचे समर्थक आणि 80 लोकांनी टोल नाक्यावर टोल वसुली बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता. टोल नाक्यावर बसून विरोधी घोषणा देत निदर्शनेही केली होती. तसेच सातार्याच्या जिल्हाधिकार्यांच्या जमाबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनावणीसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व इतरांवर वेळोवेळी साक्षी समन्स बजावण्यात आले होते. मात्र, ते न्यायालयात उपस्थित राहत नव्हते. अखेर आज आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व सर्व संशयित 18 जण न्यायालयात उपस्थित राहिले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एन. गिरवलकर यांच्या न्यायालयात सुनावणी करण्यात आली असून आता पुढील सुनावणी 9 डिसेंबर रोजी होणार आहे.