$type=ticker$snippet=hide$cate=0

सत्तेसोबतची मैत्री कायम

सत्तेसोबतची मैत्री कायम   सत्ता कुणाचीही असो, सत्तेत आपलं कुणीतरी असावं, असा विखे कुटुंबीयांचा कायम प्रयत्न राहिला आहे. विखे ज्या पक्षात अस...


सत्तेसोबतची मैत्री कायम


  सत्ता कुणाचीही असो, सत्तेत आपलं कुणीतरी असावं, असा विखे कुटुंबीयांचा कायम प्रयत्न राहिला आहे. विखे ज्या पक्षात असतात. त्या पक्षाच्या विरोधातील नेत्यांशी त्यांची मैत्री असते, हे त्रिकालााबाधित सत्य अजूनही कायम आहे. आताही अब्दुल सत्तार यांच्या सोबत झालेलं स्नेहभोजन आणि सत्तार यांनी त्यांना शिवसेनेत येण्याचं दिलेलं निमंत्रण हा वरवर जरी तात्कालिक प्रसंग वाटत असला, तरी विखे यांना त्यातून अनेक हेतू साध्य करायचे असतात. त्यामुळं विखे यांनी कितीही खुलासे केले, तरी त्यांना जो परिणाम साधायचा आहे, तो साध्य झाला आहे.

काँग्रेसमध्ये असताना राधाकृष्ण विखे यांना मानणारे जे काही मोजके आमदार होते, त्यात सिल्लोडच्या अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे. विखे मंत्री असताना औरंगाबादचे पालकमंत्री होते. त्या वेळी त्यांचं औरंगाबाद शहरातील राजेंद्र दर्डा यांच्यांशी फारसं जमलं नाही; परंतु सत्तार यांच्यांशी त्यांचं चांगलंच सूत जमलं होतं. राज्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर पक्षांतराच्या ज्या चर्चा होत असायच्या, त्यात विखे यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश होता. सिल्लोड मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला होता. शिवसेना हा मतदारसंघ सोडायला तयार नव्हती. काँग्रेसशी दोर कापलेले होते. त्यामुळं विखे भाजपत आणि त्यांचे पाठिराखे सत्तार शिवसेनेत असं ठरलं. त्याअगोदर सत्तार यांनी लोणी आणि संंगमनेरला येऊन विखे यांच्यासोबत अनेक नेते काँग्रेस सोडणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं; परंतु तीन-चार जणांनीच हाताची साथ सोडली. राज्यात शिवसेना-भाजपनं एकत्रित निवडणूक लढविली. सत्तेत दोन्ही पक्ष एकत्र आले नाहीत. त्यामुळं विखे यांना विरोधात बसावं लागलं, तर सत्तार मंत्रिमंडळात सहभागी झाले. ज्या कार्यक्रमासाठी विखे यांनी सत्तार यांना बोलविलं, तो कार्यक्रम विखे यांच्या मतदारसंघात नव्हता आणि त्यांच्या तालुक्यात नव्हता. त्यामुळं खरंतर त्यांनी दुसर्‍या तालुक्यातील कार्यक्रमासाठी सत्तार यांना बोलविणं म्हणजे श्रीरामपूर तालुक्यातील सत्ताधारी गटाच्या कार्यक्रमात हस्तक्षेप करण्यासारखंच आहे. विखे यांना असे हस्तक्षेप करणं चांगलंच आवडतं. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं सत्तार यांना बोलविलं असतं, तर भाग वेगळा; परंतु जशी सत्तार यांना विखे यांच्यांशी मैत्री ठेवावी लागते, तशीच ती खा. सदाशिव लोखंडे यांनाही ठेवावी वाटते. सत्तार यांच्या मैत्रीत सत्तार यांच्या फायद्यापेक्षा विखे यांचा राजकीय फायदा आहे. विखे सातत्यानं शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करीत असताना त्यांच्याच मांडीला मांडी लावून सत्तार आणि लोखंडे बसत असतील, तर पक्षानंच त्यांच्यावर कारवाई करायला हवी. निवडून येण्यासाठी विखे यांची लोखंडे यांना मदत हवी असते. या पार्श्‍वभूमीवर विखे यांच्या मैत्रीत कुणाचा फायदा आणि कुणाचं नुकसान याचा विचार करावा लागतो. सत्तार यांनीही सत्ताधारी आघाडीतील घटक पक्षांचं ऐकण्याऐवजी विखे यांचं का ऐकलं याचा मातोश्रीवरून जाब विचारायला हवा. श्रीरामपूरच्या आमदारांच्या विरोधात विखे यांनी काम केलं असताना लहू कानडे विखे यांचा हस्तक्षेप कसा सहन करतात, हा ही प्रश्‍न आहे.  

बरं विखे यांच्या म्हणण्यानुसार सत्तार फक्त श्रीरामपूर पंचायत समितीच्या भूमिपूजनासाठी आले असतील, तर त्यांनी तिथं राजकीय भाष्य करण्याची आवश्यकताच नव्हती; परंतु सत्तार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. अर्थात विखे यांना अशा कोणत्याही ऑफरची गरज नसते. त्यांना पाहिजे, तेव्हा ते अन्य पक्षात जाऊ शकतात. सध्या त्यांना कुठं संधी नाही आणि पुन्हा भाजपचं सरकार येईल, असं दिवास्वप्नं भाजपचे जे नेते पाहत आहेत, त्यात विखे यांचाही समावेश असल्यानं विखे सध्या भाजपत राहण्यात समाधान वाटत असावं. त्यामुळं सत्तार यांच्या ऑफरचा त्यांना विचार करावा असं वाटणार नाही; परंतु राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार जास्त स्थिर होत आहे, असं वाटायला लागलं, तर विखे सत्तार यांच्या ऑफरचा विचार करण्याची शक्यता आहे. त्यात शिवसेनेत जाण्याऐवजी पुन्हा काँग्रेसला पसंती देण्याची शक्यता दिसते. विखे यांच्यासारख्या नेत्याची राज्याला गरज असून विखे यांनी राज्याचं नेतृत्व करावे, अशी अपेक्षा सत्तार यांनी बोलून दाखविली. राज्यमंत्री सत्तार एका लग्न समारंभासाठी राहाता तालुक्यात आले होते. या वेळी त्यांनी लोणी येथे विखे पाटील यांची निवासस्थानी भेट घेतली.  तिथं स्नेहभोजन घेतलं. त्यांच्या राजकीय गप्पा काय झाल्या, हे समजायला तयार नाही. असं असलं, तरी सत्तार व विखे यांच्या भेटीकडं लक्ष लागलं होते. भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सत्तार म्हणाले, की विखे यांच्यांशी आपली जुनी मैत्री आहे. आपण एक कार्यकर्ता आहोत. माझे आणि विखे पाटलांचे वीस वर्षांपासूनचे पारिवारिक संबंध आहेत. सध्या राजकीय परिस्थिती वेगळी आहे. राजकीय परिस्थिती कशीही असली तरी संपर्क आणि संबंध कधी वाया जात नाही. माझी अशी इच्छा राहील, की विखे पाटील यांनी शिवसेनेत यावं आणि राज्याचं नेतृत्व करावे. विखे यांना मी केवळ शिवसेनेत येण्याची ऑफर देत आहे. शिवसेनेत आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतात. त्यांचा निर्णय आम्हा सर्वांना मान्य राहील. विखे पाटील यांचे शिवसेनेशी जुने संबंध आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब विखे पाटील आणि आणि स्वत: विखेही काही काळ शिवसेनेत होते. त्यांना शिवसेनेचा अनुभव आहे. राज्य सरकारमध्ये अशा नेत्यांची गरज आहे. यासाठी आपण पक्षप्रमुखांशी संपर्क करणार आहोत, असंही सत्तार यांनी सांगितलं. बाळासाहेब विखे यांच्या पुस्तकात त्यांनी शिवसेना का सोडावी लागली आणि त्यांना अपमानजनकरीत्या कसं मंत्रिपदावरून काढलं, याचा उहापोह केला आहे. अशा स्थितीत विखे पुन्हा शिवसेनेत जातील का आणि त्यापेक्षाही विखे यांनी ज्यांच्यावर कडवी टीका केली, ते उद्धव ठाकरे विखे यांना स्वीकारतील का, हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे.

विखे यांना सत्तेची ओढ असली, तरी त्यांनी ज्या पद्धतीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांना दुखावलं आहे, त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे, ते पाहता महाविकास आघाडीत विखे यांचा प्रवेश तितकासा सोपा नाही. अर्थात सरडा ज्या गतीनं रंग बदलतो, त्यापेक्षा अधिक गतीनं विखे यांची भाषा आणि पक्ष बदलले आहेत. त्यामुळं ज्या कटू शब्दांत विखे यांनी टीका केली, त्यापेक्षा अधिक साखर घातलेले गोड भाषण ते जेव्हा करायला लागतील, तेव्हा त्यांची चाल कोणत्या दिशेनं असेल, हे कळेल.

याबाबात विखे पाटील म्हणाले, की श्रीरामपूर येथे पंचायत समितीच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन करायचं होतं. हा कार्यक्रम ग्रामविकास विभागाचा आहे. त्यामुळं ग्रामविकास विभागाचे राज्य मंत्री म्हणून अब्दुल सत्तार यांना याठिकाणी बोलवलं होतं. सत्तार यांचा आणि माझा अनेक वर्षाचा स्नेह असून या कार्यक्रमाला येण्याची मी त्यांना विनंती केली, त्यांनी ती विनंती मान्य केली. त्यामुळं येथे दुसरा कोणत्याही चर्चेचा मुद्दा नाही. विखे यांचं हे स्पष्टीकरण अन्य तालुक्यातील हस्तक्षेपाचं सूतोवाच करणारं आहे. महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील नेते त्याबाबत का मौन धरून आहेत, हे कळत नाही. विखे यांच्या मांडवाखालून जावं लागत असल्यानं त्यांनी मौन धरलं असावं.


 


 


Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5577,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,111,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,3,satara,17,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10049,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,669,देश,4201,नाशिक,779,पुणे,627,बीड,1425,बुलडाणा,4,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15564,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12675,महाराष्ट्र सातारा,35,मुंबई,3491,विदेश,638,संपादकीय,1479,सातारा,3170,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: सत्तेसोबतची मैत्री कायम
सत्तेसोबतची मैत्री कायम
https://lh3.googleusercontent.com/-_CD6kaKF5nA/X7yey4JKr4I/AAAAAAABlaA/siN-lAYdL2MAEDfkyRCv47jorQmcK8vsgCLcBGAsYHQ/image.png
https://lh3.googleusercontent.com/-_CD6kaKF5nA/X7yey4JKr4I/AAAAAAABlaA/siN-lAYdL2MAEDfkyRCv47jorQmcK8vsgCLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_497.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_497.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content