Breaking News

सरपंच जनतेतुन च्या अफवाच सरपंच निवड सदस्यातुनच !

सरपंच जनतेतुन च्या अफवाच सरपंच निवड सदस्यातुनच!
------------
तालुक्यातील मुदत संपलेल्या ८८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार!
-------------
गाव पातळीवर निवडणुकीचा आखाडा रंगला फक्त आयोगाच्या घोषणेची प्रतिक्षा.
--------------
कोरोनात ही तालुक्यात निवडणुकीच्या वातावरणाने भरला रंग .


शशिकांत भालेकर/पारनेर -
पारनेर तालुक्यातील ८८ गावातील ग्रामपंचायती ची मुदत संपलेली आहे येथे सध्या प्रशासक कामकाज पाहत आहेत. या निवडणुकीच्या हालचाली सध्या सुरू झालेल्या आहेत प्रशासकीय पातळीवरून या ग्रामपंचायत चे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहेत त्याचा प्रोग्रॅम नुकताच पार पडला आहे त्यानंतर कोणत्याही क्षणी पुढील कार्यक्रम लागणार आहे मात्र त्यापूर्वी काही सोशल मीडियावर सरपंच पुन्हा जनतेतून अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत मात्र ह्या अफवा खोट्या असल्याची माहिती समोर येत आहे.
पारनेर तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतीची निवडणूक २०२१मध्ये होण्याची शक्यता आहे त्यानुषंगाने प्रशासन पातळीवरून हालचाली सुरू आहेत तालुक्यातील निवडणुकी असलेल्या गावात  आता याबाबत चर्चा झडू लागल्या असून निवडणुकीचे वातावरण गावांमध्ये घुमू लागले आहे अनेक इच्छुक उमेदवारानीं मतदारांच्या  संपर्कात येण्यास सुरुवात केली आहे मात्र नुकतेच काही समाज माध्यमांवर सरपंच हा पुन्हा जनतेतून होणार आहे अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या गेल्याने इच्छुक उमेदवार तसेच गावांमधील ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधाण आले आहे मात्र सरपंच हा सदस्यांमधून निवडला जाणार आहे महाविकास आघाडी सरकारने सरपंच जनतेतुन निवडला जाणार हा कायदा रद्द केला आहे त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये सरपंच हा सदस्यांमधूनच निवडला जाणारा आहे.तालुक्यातील ११३ ग्रामपंचायतींपैकी ८८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत कोरोना असतानाही तालुक्यात निवडणुकीच्या वातावरणाने रंग भरला आहे जानेवारी दरम्यान निवडणुका होण्याची शक्यता आहे त्यानुसार गावपातळीवर खलबते सुरू झाले आहेत.महाविकास आघाडी सरकारने जनतेतून सरपंच निवड हा कायदा रद्द केला आहे तो कायदा रद्द झाल्यामुळे जे सरपंच जनतेतून निवडून आले होते त्यांच्यावर काही ग्रामपंचायत मध्ये अविश्वास ठराव आणण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्या होत्या काही ठिकाणी अविश्वास ठराव आलाही होता व ते प्रकरण न्यायालयात गेले होते त्यानंतर महाविकास आघाडीसरकारने याबाबत निर्णय घेतला जे सरपंच जनतेतून निवडून गेले आहेत त्यांच्यावर सदस्याने अविश्वास ठराव आणता येणार नाही त्यासाठी यापूर्वीचेच नियम लागू राहणार आहे मात्र याच वृत्ताचा वेगळा अर्थ काही ठिकाणी घेतला गेला व येत्या निवडणुकीत जनतेतून सरपंच होणार असल्याच्या बातम्या पसरवल्या गेल्या त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे मात्र यात काही तथ्य नाही.
 
यापुढे जनतेतून सरपंच हे म्हणण्याला काही अर्थ नाही ते कायदेशीर होत नाही सोशल मीडियातून येणारे वृत्त पूर्णपणे खोटे आहे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात परंतु कायदा हा वेगळा आहे २०१७ ला जो कायदा बनवला होता त्यातून थेट जनतेतून सरपंचाची निवड केली जात मात्र ५ मार्च २० ला या कायद्यात दुरुस्ती करून सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार नसून पुन्हा सदस्यातुन होईल असे त्यात नमूद केले गेले त्यामुळे येथून पुढे होणाऱ्या निवडणुकीमध्ये सरपंचाची निवड ही सदस्यांमधून होणार आहे.
----------
नामदेव घुले
अध्यक्ष सरपंच ग्रामसंसद महासंघ 

 दि.२ रोजी तालुक्यातील८८ ग्रामपंचायत चे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले यानंतर प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे हरकती होऊन अंतिम यादी प्रसिद्ध होईल त्यानंतर सरपंचाची आरक्षणाची सोडत केली जाणार आहे त्यानुसारच कोणत्या गावात सरपंच पदासाठी कोणते आरक्षण पडले हे स्पष्ट होईल निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील अशी प्रक्रिया पुढील काळामध्ये होणार आहे त्याबाबतचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर झाल्यानंतरच तारखांबाबत स्पष्टता येईल.