Breaking News

पारनेरचे भूमिअभिलेख कार्यालय कुलूपबंद कारभार तहसीलदार यांनी याबाबत अधिकाऱ्यांना सुनावले

पारनेरचे भूमिअभिलेख कार्यालय कुलूपबंद कारभार तहसीलदार यांनी याबाबत अधिकाऱ्यांना सुनावले.
-----------
कोरोनामुळे कर्मचारी अधिकार्‍यांच्या सुरक्षिततेसाठी भूमी अभिलेख कार्यालयाच्या मुख्य दरवाजाला बाहेरून कुलूप.
-------------
अधिकाऱ्यांना भेटण्यास मनाई होती कोरोना चे कारण  समोर केले जात असे त्यामुळे नागरिकही हतबल.
--------------
कार्यालयाचे दरवाजे उघडे ठेवून सॅनिटायझर व थर्मामीटर ठेवून काम करण्याचे तहसीलदार यांनी दिले आदेश.


पारनेर प्रतिनिधी- पारनेर येथील भुमिअभिलेख चा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे ४२क पोट खराबा कोर्ट वाटप आदी तहसील कार्यालयातील प्रकरणे प्रलंबित होते यासंदर्भात तहसीलदार ज्योती देवरे यांनी भुमिअभिलेख कार्यालयास लेखी कळवले तसेच अनेक वेळा त्यांना बोलूनही कोणी न आल्याने स्वतः तहसिलदार यांनी भूमी अभिलेख कार्यालयात भेट दिली त्यावेळी त्यांना बाहेरच भूमिअभिलेख कार्यालयाचा दरवाजाला कुलूप असल्याचे दिसले त्यानंतर त्यांनी विचारणा केली असता कोरोना मुळे दरवाजा कुलूप असून खिडकी पद्धतीने काम चालू आहे असे त्यांना कळले हे पद्धत चुकीची असल्याचे तहसीलदार यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले व त्वरित कार्यालयाचे कुलूप उघडून काम सुरू ठेवण्याचे आदेश दिले.


 तहसील कार्यालयाजवळ असणाऱ्या भूमि अभिलेख कार्यालय नेहमीच अनेक विषामुळे चर्चिले जात आहे सर्वसामान्यांना याची प्रचिती वेळोवेळी येत असते मात्र या कार्यालयाचाअनुभव ज्योती देवरे यांना देखील आला तहसिल विभागामार्फत चे काही प्रकरणे प्रलंबित असल्याने संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी माहिती दिली त्यासंदर्भात पत्रव्यवहार केला तरीही या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली त्यांच्याकडून कोणतेही उत्तर न आल्याने  तहसीलदार ज्योती देवरे यांनी थेट भुमी अभिलेख कार्यालय गाठले यासंबंधीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता भूमी अभिलेख कार्यालयाचा वेगळाच प्रकार समोर आला या कार्यालयाचे कामकाज बाहेरून कुलूप लावून चालल्याचे समोर आले त्यानंतर तहसिलदार यांनी हे कुलूप कशासाठी आहे याची विचारणा केली असता कोरोनामुळे सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना आत मध्ये येऊ न देता नागरिकांसाठी खिडकी योजना सुरू असल्याचे सांगण्यात आले मात्र तहसीलदार यांनी त्यांना सांगितले की मी कोरोना आपत्ती व्यवस्थापक आहे कोणत्याही प्रकारचा असा कार्यालयास कुलूप लावून कामकाज करण्याचा आदेश नाही सॅनिटायझर व थर्मामीटर ठेवून काम सुरू ठेवण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले यापुढे जर कार्यालय बंद ठेवून  कामकाज सुरू राहिल्यास कारवाई करण्यात येईल असेही तहसीलदार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले.

 भुमिअभिलेख विभागाचा कारभार अनेक दिवसापासून कुलूपबंद खिडकी योजना सुरू अशा प्रकारे चालू आता नागरिकांना अधिकाऱ्यांना भेटण्यास मनाई होती कोरोना चे कारण  समोर केले जात असे त्यामुळे नागरिकही हतबल होत अधिकारी खिडकी मधूनच भेटत होते कार्यालय बंद करून खिडकी योजना सुरू करण्याचे कोणतेही आदेश नसताना या विभागाने अनेक दिवस अशा पद्धतीने कामकाज केले तहसीलदार ज्योती देवरे यांनी या कार्यालयाला भेट दिली जवळपास पंधरा ते वीस मिनिटे  त्यादेखील दरवाजाला कुलूप असल्याने बाहेरच उभ्या होत्या त्यानंतर त्यांनी या संदर्भात अशा प्रकारचे कोणतेही आदेश नसताना काम केल्याबाबत या कार्यालयाला सुनावले आहे व यापुढे  असे आढळल्यास कारवाई केली जाईल अशाप्रकारे खडसावले त्यानंतर कार्यालयाचे कुलूप नागरिकांसाठी उघडले आहे.