$type=ticker$snippet=hide$cate=0

ओबीसी समाजाचे आरक्षण बचावासाठी मोर्चा; मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची भुमिका

कळवण / तालुका प्रतिनिधी : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व  ओबीसी आरक्षण बचाव  समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विविध मागण्यांसाठी  समता...



कळवण / तालुका प्रतिनिधी :

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व  ओबीसी आरक्षण बचाव  समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विविध मागण्यांसाठी  समता परिषदचे तालुकाध्यक्ष शशिकांत बागुल यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार बी ए कापसे यांना  देण्यात आले. 

    या मोर्चाला कोल्हापूर फाटा येथून सुरवात करण्यात आली. यावेळी आरक्षण आमचे हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, ओबीसी आरक्षण बचाव समिती जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर या मोर्चाचे रूपांतर सभेत होऊन यावेळी शशिकांत बागुल, नंदकुमार खैरणार, राजेश कोठावदे, प्रा अशोक देशमुख, यांनी मनोगत व्यक्त केले. सोशल डिस्टनसिंगचे पालन करीत आंदोलन करण्यात आले. यावेळी मोर्चाचे नेतृत्व करणारे पाच प्रमुख नेते मंडळींचे  शिष्टमंडळाने तहसीलदार यांचे दालनात जाऊन तहसीलदार बी ए कापसे याना ओबीसी समाजाच्या प्रमुख मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात सर्व समाजातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदविला. 

       यावेळी समता परिषद तालुकाध्यक्ष शशिकांत बागुल, जिल्हा उपाध्यक्ष ओबीसी आरक्षण बचाव समिती अजय मालपुरे, पंचायत समिती उपसभापती विजय शिरसाठ, तालुका सरचिटणीस भाजपा  डॉ अनिल महाजन, जिल्हाध्यक्ष ओबीसी बचाव समिती जगदीश कोठावदे, शिवसेनेचे सचिन राणे, बारा बलुतेदार संघटनेचे तालुकाध्यक्ष  मधुकर बोरसे,  सुभाष शिरोडे, जेष्ठ शिवसैनिक अशोक जाधव, तालुकाध्यक्ष शेतकरी संघटना बाळासाहेब शेवाळे, लाडशाखीय वाणी समाज अध्यक्ष  दिपक  महाजन, सोमनाथ सोनवणे  काशिनाथ वालखडे, व्ही के  व्यवहारे , भरत हिरे, संजय शेवाळे, लोटन गांगुर्डे, सागर खैरनार, विनोद शेवाळे, प्रकाश बच्छाव, आनंद नागमोती, रवी सोनवणे, हेमंत रावले,  कृष्णकांत कामळसकर आदींसह ओबीसी समाज बांधव उपस्थित होते 

अशा आहेत मागण्या -  ओबीसींची जातनिहाय जण गणना करावी, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये, मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण द्यावे, ओबीसी समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवू नये, ओबीसी समाजात ४०० पेक्षा जास्त जातींचा समावेश असल्याने संपूर्ण २७ टक्के आरक्षण मिळावे. आदी. 

-----------------------

 मराठा समाजाला आरक्षण देण्यास ओबीसी समाजाचा कोणताही विरोध नाही. परंतु शासनाने कोणत्याही समाजाला आरक्षण देतांना ओबीसी आरक्षण कोट्यातुन देऊ नये. ओबीसी आरक्षणास धक्का लावल्यास ओबीसी समाजाचे प्रणेते छगनराव भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली देशातील ओबीसी समाजातील सर्व जाती धर्म एकत्र येऊन देशव्यापी आंदोलन छेडू .  

शशिकांत बागुल - अध्यक्ष समता परिषद कळवण तालुका -


Name

] ब्रेकिंग,844,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5533,letest News,582,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,1,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9934,औरंगाबाद,354,क्रीडा,672,दखल,656,देश,4132,नाशिक,772,पुणे,579,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15277,ब्रेकिंग न्युज,110,मनोरंजन,154,महाराष्ट्र,12359,महाराष्ट्र सातारा,6,मुंबई,3420,विदेश,634,संपादकीय,1456,सातारा,3145,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: ओबीसी समाजाचे आरक्षण बचावासाठी मोर्चा; मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची भुमिका
ओबीसी समाजाचे आरक्षण बचावासाठी मोर्चा; मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची भुमिका
https://1.bp.blogspot.com/-b57kkDa7Iuo/X8D1wTnWy4I/AAAAAAABl4I/IHtyCNsq1XsE8DbuFeKtVrjX7CPjgXexACLcBGAsYHQ/s320/maratha.jpg
https://1.bp.blogspot.com/-b57kkDa7Iuo/X8D1wTnWy4I/AAAAAAABl4I/IHtyCNsq1XsE8DbuFeKtVrjX7CPjgXexACLcBGAsYHQ/s72-c/maratha.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_502.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_502.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content