$type=ticker$snippet=hide$cate=0

ड्रॅगनला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तराची गरज

    भारतापेक्षा चीनच्या सैनिकांची संख्या कितीतरी जास्त आहे. साधनसामुग्रीही जास्त आहे; परंतु प्रत्यक्ष ही सामुग्री कशी तोकडी पडते, हे भारतानं...

 



  भारतापेक्षा चीनच्या सैनिकांची संख्या कितीतरी जास्त आहे. साधनसामुग्रीही जास्त आहे; परंतु प्रत्यक्ष ही सामुग्री कशी तोकडी पडते, हे भारतानं चीनला 15 व 16 जूनला पूर्व लडाखमध्ये दाखवून दिलं. भारतानं दिलेल्या कडव्या प्रत्युत्तराची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. चीन जागतिक पातळीवर एकाकी पडला असला, तरी त्याची खुमखुमी जात नाही. त्यामुळं त्याची मुत्सद्दीपातळीवर कोंडी करण्याबरोबरच त्याला एक तडाखा देण्याची आवश्यकता आहे.

गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ चीननं पूर्व लडाखमध्ये तळ ठोकला आहे. तिथं झालेल्या संघर्षात भारताच्या वीस जवानांना वीरमरण आलं; परंतु भारतीय जवानांनी चीनच्या चाळीसहून अधिक जवानांना यमसदनी धाडलं. तेव्हापासून चीनच्या सैन्यात नाराजी आहे. चीननं कितीतरी दिवस त्यांच्या मृत सैनिकांची नावं जाहीर केली नाहीत. एवढंच नव्हे, तर त्यांच्या पार्थिवावर परस्पर अंत्यसंस्कार केले. त्यामुळं सामान्य नागरिकांतही नाराजी आहे. आताही चीनच्या सैन्यात भरती व्हायला युवक तयार नाहीत. जागतिक समूहानं टाकलेल्या बहिष्कारानं चीनला आता आर्थिक धोरणाचा फेरविचार करण्याची आवश्यकता भासते आहे. असं असलं, तरी चीनच्या बाबतीत जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, हेच खरं. त्याच्यावर कधीच विश्‍वास ठेवता येणार नाही. आताही चीनची मित्रराष्ट्रंच त्याच्यावर अविश्‍वास दाखवित आहेत. चीननं पूर्व लडाखमधील सैन्य माघारी घेण्याची तयारी दाखविली असताना लगेच त्यावरून घूमजाव केलं. अतिशय थंडीच्या काळातही चीन पूर्व लडाखमध्ये ठाण मांडून आहे. गेल्या सहा महिन्यांपासून चीन तिथून हलायला तयार नाही. भारतानं तिथं मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केलं असताना आता चीननं भारताच्या अन्य सीमांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. ईशान्य भारतात चीननं आगळीक करण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी डोकलाममध्ये अडीच महिन्यांहून अधिक काळ भारत-चीनचं सैन्य आमने सामने होते. त्या वेळी तिथून माघार घेतलेला चीन आता पुन्हा तिथं आला आहे. सैन्याच्या हालचालीसाठी त्यानं डोकलाम भागाजवळ बंकर आणि मजबूत रस्ते बांधले आहेत. भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारतावर आहे. असं असताना काही दिवसांपूर्वीच चीननं भूतानच्या सीमेत घुसखोरी करत एक गाव वसवलं आहे. भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीनं हे मोठं आव्हान आहे. सिक्कीम तेथून जवळच असल्यानं चीनच्या या कारवायांनी भारताची झोप उडणं स्वाभावीक आहे. एकाच वेळी सर्व सीमांचं रक्षण करण्याबरोबरच चीन आणि पाकिस्तानशी कठोर मुकाबला करण्याचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसेनाध्यक्ष बिपीन रावत यांनी वारंवार देऊनही ड्रॅगन अजिबात नमतं घ्यायला तयार नाही. भारत आणि चीन दरम्यान वाद झालेल्या क्षेत्रात चीननं सैन्य आणि दारूगोळा ठेवण्यासाठी बंकर बनवले आहेत. हे बांधकाम सिंचे-ला पासपासून जवळपास अडीच किलोमीटर अंतरावर आहे. उपग्रह छायाचित्रांतून याबाबतची माहिती मिळाली असून चीन या भागात आपली लष्करी ताकद वाढवत असल्यानं भारताला अधिक सावध होण्याची गरज आहे. फोर्स अ‍ॅनालिसीसचे विश्‍लेषक आणि प्रमुख सॅटेलाइट इमेजरी एक्सपर्ट सिम टेक यांनी सांगितलं, की चीनकडून नवीन बंकर निर्मितीचा उद्देश्य स्पष्ट असून त्यांना या भागात आपली ताकद वाढवायची आहे. या भागात युद्धजन्य परिस्थिती तयार झाल्यास तात्काळ हालचाल करून अधिक कुशलतेनं लढाई करता येऊ शकतं.

चीननं भूतानच्या हद्दीत गाव वसवल्यानंतर या भागात नऊ किलोमीटरचा रस्ता तयार केला आहे. यामुळं चिनी सैन्याला जोंपलरी डोंगराळ भागात जाण्यासाठी एक पर्यायी रस्ता तयार झाला आहे. भारतीय सैन्यानं 2017 मध्ये चीनला या जोंपलरीमध्ये जाण्यापासून अडवलं होतं. चिनी सैन्याला 2017 मध्ये जोंपलरीपर्यंत रस्ता बनवायचा होता. हा मार्ग भारतीय सैन्याच्या डोका ला पोस्टपासून जातो. हा भाग सिक्कीम आणि डोकलाच्या सीमेवर आहे. चिनी सैन्य जोंपलरी डोंगराळ भागात पोहचल्यास त्यांना भारताच्या चिकन नेक समजलं जाणार्‍या सिलगुडी कॉरिडोअरवर थेट लक्ष ठेवता येऊ शकतं. सिलगुडी कॉरिडोअर हा ईशान्य भारताला उर्वरीत भारताशी जोडून ठेवतो. त्यामुळं हा भाग भारतासाठी महत्त्वाचा आहे. भारतानं हा रस्ता बनविण्यास हरकत घेतली होती. त्यानंतरही ते काम करण्यात आलं. चीनच्या आक्रमक विस्तारवादामुळं संपूर्ण जगात चिंता व्यक्त केली जात आहे. चीनकडून शेजारच्या देशांच्या भूभागांवर आणि समुद्राच्या हद्दीवरही दावा सांगण्यात येतो. व्हिएतनाम, फिलिपिन्स, जपान आदी देशांनी चीनच्या दक्षिण चिनी समुद्रातील वावरास हरकत घेतली आहे, तरी चीनच्या युद्धनौका त्या भागात तैनात आहेत. डोकलामजवळच्या भागात चीननं किती विकास केला, हे दाखवण्यासाठी एका पत्रकारानं या भागाचे फोटो प्रसिद्ध केले. त्यामुळं चीन आणखीच अडचणीत आला. शेन हे या पत्रकाराचं नाव. शेन यांनी पांगडा गावाचा नकाशाही शेअर केला. हा भूभाग भूतानच्या सीमेपासून दोन किलोमीटर आत आहे. शेन यांनी हे ट्विट डिलीट केलं, तर दुसरीकडं ओपन इंटेलिजेंस सोर्सनं एक इमेज शेअर केली असून गाव वसवलं गेलं असल्याचा दावा केला आहे. चीननं या भागात मागील वर्षापासूनच बांधकाम करण्यास सुरुवात केली होती. एका नकाशानुसार, भूतानच्या हद्दीत वसवलेल्या गावापासून पश्‍चिमेला सिक्कीम असून उत्तर दिशेला चीन आहे; मात्र भूताननं चीनला या भागात गाव वसवण्याची परवानगी दिली अथवा नाही हे स्पष्ट झालं नाही. भूताननंही अधिकृत भूमिका मांडली  नाही. चीन हळूहळू अशा प्रकारची पावलं उचलून आपल्या सीमा विस्तारत आहे, तर दुसरीकडं भूतानच्या क्षेत्रीय अखंडतेच्या मुद्यावर भारताकडून चिंता व्यक्त केली जात आहे. डोकलामजवळ चीनच्या वाढत्या हालचालींमुळं लडाखमध्ये सुरू असलेला तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. डोकलाम हा भाग भारतासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. भारत आणि चीनमध्ये गलवान खोर्‍यात तणावाचं वातावरण असताना चीननं नेपाळचा 150 हेक्टरचा भूभाग बळकावला असल्याचा आरोप करण्यात येत होता. मे महिन्यात चीननं नेपाळचा हा भूभाग बळकावण्यास सुरुवात केली. चीननं आपलं लष्कर या भागात तैनात केलं होतं. चिनी सैन्यानं लिमी खोरे आणि हिल्सा भाग ओलांडून दगडी सीमा खांबांना हटवलं. त्यानंतर हा भाग आपला असल्याचं सांगत चीननं या ठिकाणी लष्करी तळ उभारण्यास सुरुवात केली. शेजारच्या देशांचे लचके तोडण्याचं काम चीन थांबवत नाही. त्याचं सीमेवरच्या प्रत्येक देशाशी भांडण आहे. मित्राचा गळा कापायलाही तो कमी करीत नाही. जागतिक समुदायाला याची कल्पना असून आता तिबेट, तैवान आणि हाँगाँगच्या मुद्यावर चीनची कोंडी केल्याशिवाय चीन वठणीवर येणार नाही.


 


भारत आणि शेजारच्या देशांच्या भागांवर दावा सांगत आक्रमक विस्तारवादी धोरण स्वीकारणार्‍या चीनसमोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. चीनमधील तरुणांनी चिनी सैन्य भरतीकडं पाठ फिरवली असल्यामुळं चीनला वेगळ्याच समस्येला सामोरं जावं लागत आहे. दुसरीकडं जवळपास 5 कोटी 70 लाख माजी सैनिकांना निवृत्तीनंतरही सुविधा मिळत नसल्यानं त्यांच्यातही असंतोष खदखदत आहे. हाँगकाँगमधील ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या वृत्तपत्रानुसार, चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी उच्चशिक्षित तरुणांना आकर्षित करण्यास अपयशी ठरत आहे. या युवकांकडं आधीच्या पिढीपेक्षा अधिक चांगल्या रोजगाराच्या संधी आहेत. वुहान विद्यापीठातील राजकीय अभ्यासक प्रा. क्नि किआनहोंग यांनी सांगितलं, की चीनला या मुद्यावर आणखी काम करावं लागणार आहे. युवकांसाठी चिनी लष्कर हे त्यांच्या करिअरसाठी चांगला पर्याय आहे, हे त्यांना पटवून द्यावं लागणार आहे. चीनमध्ये माजी सैनिकांमध्येही असंतोष निर्माण होत आहे. मागील काही वर्षात चीनमध्ये माजी सैनिकांकडून आंदोलन छेडण्यात येत आहे. मागील वर्षी जानेवारीत आंदोलन करण्यात आलं होतं. माजी सैनिकांमधील असंतोष कमी करण्यासाठी चीन सरकारनं एका विधेयकाला मंजुरी दिली आहे. ‘शिन्हुआ’ने दिलेल्या वृत्तानुसार, माजी सैनिकांना आता नोकरीच्या इतर संधी, भत्ते, नोकरी, प्रशिक्षण आदी सुविधा देण्यात येणार आहेत. त्याशिवाय स्थानिक सरकारदेखील माजी सैनिकांना पर्यायी रोजगार देण्यासाठी मदत करणार आहेत. याआधी चिनी जवानांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. हे चिनी सैनिकांची पोस्टिंग भारतीय सीमेजवळ करण्यात येत असल्यामुळं ते रडत आहेत, असा दावा करण्यात आला होता. मोठ्या प्रमाणावर बदनामी होत असल्यामुळं प्रशासनानं हा व्हिडिओ ‘सोशल मीडिया’वरून डिलीट केला. असं असलं, तरी माजी सैनिकांतील अस्वस्थता बाहेर आली, ती आलीच.


 


Name

] ब्रेकिंग,844,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5533,letest News,582,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,1,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9934,औरंगाबाद,354,क्रीडा,672,दखल,656,देश,4132,नाशिक,772,पुणे,579,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15277,ब्रेकिंग न्युज,110,मनोरंजन,154,महाराष्ट्र,12359,महाराष्ट्र सातारा,6,मुंबई,3420,विदेश,634,संपादकीय,1456,सातारा,3145,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: ड्रॅगनला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तराची गरज
ड्रॅगनला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तराची गरज
https://lh3.googleusercontent.com/-hA7spyYdGYI/X70IFQDmuVI/AAAAAAABllY/XNmq_ChQUWE4qijXQQCMfUdpOmX_zLxIACLcBGAsYHQ/image.png
https://lh3.googleusercontent.com/-hA7spyYdGYI/X70IFQDmuVI/AAAAAAABllY/XNmq_ChQUWE4qijXQQCMfUdpOmX_zLxIACLcBGAsYHQ/s72-c/image.png
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_504.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_504.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content