Breaking News

ऊसाने भरलेल्या ट्रॉलीच्या चाकाखाली चिरडून एकाचा मृत्यू

 





कर्जत तालुक्यातील हिंगणगाव शिवारामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची दुचाकीला धडक बसल्याने अंकुश शेळके (रा. गार, ता. श्रीगोंदा) यांचा मृत्यू झाला.

या अपघातात त्यांची पत्नी सुमन शेळके या गंभीर जखमी झाले आहेत. कर्जत तालुक्यातील हिंगणगाव शिवारामध्ये दोन ट्रॉली एकमेकांना जोडून ट्रॅक्टर द्वारे ऊस वाहतूक केली जाते.

अशाच ट्रॅक्टरची शेळके यांच्या दुचाकीला धडक बसली. अंकुश हे दुचाकीवरून खाली पडून ऊसाने भरलेल्या ट्रॉलीच्या चाकाखाली सापडले. यात त्यांचा मृत्यू झाला.

ऊसाने भरलेल्या ट्रॉलीच्या चाकाखाली सापडले. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या पत्नी सुमन या देखील गंभीर जखमी झाले आहेत. ट्रॉली एकमेकांना जोडून ऊसाची ओव्हरलोड वाहतूक करण्याच्या प्रकार वाढला आहे.

यातूनच असे अपघात होत आहे. ऊसाची ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर तसेच ट्रक यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.