Breaking News

कोपरगाव ग्रामिण पोलिस निरीक्षक कटके यांची बदली !

कोपरगाव ग्रामिण पोलिस निरीक्षक कटके यांची बदली


कोपरगाव श./प्रतिनिधी : अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षकपदी कोण बसणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चला पूर्णविराम मिळाला असून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल बबन कटके यांची एलसीबीचे पीआयपदी म्हणून बदली करण्यात आली आहे.
 एलसीबी मिळावी म्हणून जिल्ह्यातील अनेक पोलीस निरीक्षक गुडघ्याला बाशिंग बांधून होते. यामध्ये संपत शिंदे, नितीनकुमार गोकावे, मुकुंद देशमुख, अभय परमार, दौलतराव जाधव यांसह अनेक पोलीस निरीक्षक एलसीबी मिळावी म्हणून वेगवेगळ्या मार्गाने फिल्डिंग लावीत होते. मात्र सर्वाचा पत्ता कट करून अनिल कटके एलसीबीला बसल्याने इच्छुकांना धक्का बसला आहे.