'हे' राज्य सरकार सर्वच आॅनलाईन गेम्सची हाकलपट्टी करणार मुंबई | सध्या ऑनलाईन गेम्सनं धुमाकुळ घातला आहे. हजारो लोक ऑनलाईन गेम्सच्या...
'हे' राज्य सरकार सर्वच आॅनलाईन गेम्सची हाकलपट्टी करणार
मुंबई | सध्या ऑनलाईन गेम्सनं धुमाकुळ घातला आहे. हजारो लोक ऑनलाईन गेम्सच्या प्रेमात पडले आहेत. आज हजारो गेम इंटरनेटवर उपलब्ध आहेत. लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंतचे अनेक लोक गेमच्या प्रेमात वेडे झाले आहेत. मात्र, या ऑनलाईन गेम्समुळे खिशाला कात्री लागल्याचं समोर येत आहे.
यामुळेच सर्व ऑनलाईन गेम बंद करण्याचा निर्णय घेण्याचे संकेत कर्नाटक सरकारने दिले आहेत. कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
ऑनलाईन गेम खेळण्यासाठी पैसे लागतात आणि ते पैसे पालकांकडून न मिळाल्याने अनेल मुलांनी आ.त्मह.त्या केल्या़च देखील समोर आलं आहे. तसेच यामुळे काही विद्यार्थ्यांच्या डोक्यावर देखील परिणाम झाले आहेत. ऑनलाईन गेम्सबाबत पालकांच्या बऱ्याच तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे राज्यात अशा प्रकारच्या गोष्टींना प्रोत्साहन मिळू नये यासाठी ऑनलाईन गेम्सवर बंदी आणण्याचा विचार आहे, असं बोम्मई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
आॅनलाईन गेममुळे अनेक तरून उध्वस्त झाले आहेत. दिवस दिवस गेम खेळण्यासाठी वेळ घालवून ते त्यांच्या शिक्षणाची वाट बंद करून बसले आहेत. यापुर्वी गेमवर बंदी घालण्यासाठी ज्या राज्यांनी निर्णय घेतले होते त्या राज्यांकडून सूचना मागवण्यात येतील, अशीही माहितीही बसवराज बोम्मई यांनी दिली आहे .
दरम्यान, पबजी या गेमने तर तरुणीला वेड करून सोडलं आहे. लहान मुलांपासून तरुणांपर्यंत पब्जीची ' क्रेझ ' तयार झाली आहे. या खेळामुळे आक्रमकता, हिंसा, व्यसनाधीनता वाढत चालली आहे.
मुलांच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यासाठी हे घातक असल्यामुळे पब्जीवर बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रम्मी आणि पोकर या गेमवर देखील बंदी आणण्याचा निर्णय यापूर्वीच अध्रप्रदेशमधे घेतला गेला होता.
ऑनलाइन जु.गाराने तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवलं आहे. दिशाभूल करुन तरुणांचं नुकसान केलं जात होतं. यामुळेच आम्ही तरुणांचं रक्षण करण्याच्या हेतूने अशा पद्धतीच्या सर्व ऑनलाइन गेम्सवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे, असंही कर्नाटक सरकारने स्पष्ट केलं आहे.
ही गेम खेळणाऱ्या प्रत्येकाला कडक कारवाईला सामोरे जावं लागेल. अशा गेम खेळणाऱ्याला सहा महिन्याचा तुरुंगवास तसेच दंड देखील भरावा लागू शकतो.