पिंपरी जलसेन/प्रतिनिधी : नवोपक्रमशील शाळा म्हणून विविध स्पर्धांमध्ये कायम यशस्वी कामगिरी करणारी पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा...
पिंपरी जलसेन/प्रतिनिधी : नवोपक्रमशील शाळा म्हणून विविध स्पर्धांमध्ये कायम यशस्वी कामगिरी करणारी पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेची पिंपरी जलसेन प्राथमिक शाळेने इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात नेत्रदिपक यश संपादन केले.
गुणवत्तेचा ध्यास घेवून चाललेल्या या शाळेने यावर्षीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये (फेब्रु 2020) अतिशय दर्जेदार असे यश संपादन करुन यावर्षी शाळेचे तब्बल 14 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत पात्र झालेले आहे. ग्रामीण भागातील शाळा असून देखील अतिशय नेत्रदीपक यश या शाळेने संपादन केले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये या शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत असून पारनेर तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्येही या शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी आहेत त्याबद्दल विविध स्तरांतून या शाळेच्या कामगिरीवर कौतुकाची थाप पडत आहे.
यशस्वी विद्यार्थी
गणेश बढे- 258 (राष्ट्रीय ग्रामीण संच )जिल्हयात सातवा, अनन्या खोडदे-252 (ग्रामीण सर्वसाधारण संच ) जिल्ह्यात प्रथम , स्वराली पुणेकर- 236, अस्मिता खोडदे- 232, वेदप्रकाश मते- 230, श्रावणी गाडेकर-226, निरंजन सोनवणे-224, ओम लोंढे-222, राजश्री अडसरे-222, शिवराज बढे- 218, साहील शेळके-214, ज्ञानेश्वरी थोरात-214, सार्थक परांडे-210, अन्वेश कदम-208 यांचा समावेश आहे.