मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकल्यानंतर ही कारवाई राजकीय सुडबुद्धीतून होत असल्याची टीका महाविकास आघाडीच्या...
मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकल्यानंतर ही कारवाई राजकीय सुडबुद्धीतून होत असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. मात्र, भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. ईडीचा छापा कुणाच्याही घरावर पडू शकतो. उद्या माझ्याही घरावर पडू शकतो. आपण स्वच्छ असल्यास घाबरायचे कारण नाही, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली आहे.
आपण स्वच्छ आल्यास ईडीला घाबरायचे कारण नाही. प्रताप सरनाईक स्वच्छ असतील तर त्यांनी ईडीला घाबरायचे कारण नाही. छापा कुणाच्याही घरावर पडू शकतो. माझ्याही घरावर छापा पडला तर मी स्वच्छ असेल तर घाबरणार नाही, अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली. सरनाईक यांच्या घरावर मारण्यात आलेला छापा हे केंद्र सरकारचं षडयंत्र असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. त्यावर दानवे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
------------------------------------------------------