अकोले /प्रतिनिधी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडॉऊनच्या काळात महावितरकडून अव्वाच्या सव्वा बिले आकारण्यात आली. या निषेध करत...
अकोले /प्रतिनिधी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडॉऊनच्या काळात महावितरकडून अव्वाच्या सव्वा बिले आकारण्यात आली. या निषेध करत शेतकर व भाजप कार्यकर्त्यांकडून माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली अकोले येथे वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढून वीज बिलाची होळी करण्यात आली.
तर तहसीलदार मुकेश कांबळे व कार्यकारी अभियंता बागुल यांना निवेदन देण्यात आले. प्रंसगी भाजपचे गट नेते जालिंदर वाकचौरे, गिरजाजी जाधव, रेशमाताई गोडसे सभापती उर्मिला राऊत उपसभापती दत्ता देशमुख, परबत नाईकवाडी, अशोक देशमुख, जिल्हा भाजप महिला अध्यक्ष सोनाली नाईकवाडी, तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे, यशवंत अभाळे, राजेंद्र डवरे, गंगाराम धिंदळे, भरत घाणे, श्रवणा भांगरे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. गोंधळ घालून सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. तर वीज बिलाची होळी करून तहसीलदार कचेरी पर्यंत पायी शेतकरी व कार्यकर्ते मोर्चाने आले. प्रसंगी बोलताना जालिंदर वाकचौरे यांनी राज्याचे तीन पक्षाचे आघाडी सरकार शेतकर्यांना वीज बिल देऊन कोरोना संकटात त्यांना बिलाचा शॉक देत आहे. राज्यात शेतकर्यांच्या अन्नात मीठ कालवण्याचे काम होत आहे. तालुक्याचे आमदार प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न न करता चमकोगिरी करत आहे. तर भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष सोनाली नाईकवाडी, अशोक देशमुख, श्रवणा भांगरे, गिरजाजी जाधव, सीताराम भांगरे, वकील वसंत मानकर, यशवंत आभाळे यांनी सरकार विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या सरकार विरोधात घोषणा देत. शेतकर्यांचे वीज बिल अगोदर माफ करा मात्र वीज कट केले तर शेतकरी हातात काठी घेतल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा यावेळी देण्यात आल्या.
अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन 4 डिसेंबरला करु : पिचड
शेतकरी 8 महिने घरी बसून आहे, पिके गेली हातात अल्प तुटपुंजी मदत तर खावटीचे कागदी घोडे नाचविले जात असून, राज्य सरकार सारथी संस्था बंद करू पाहत आहे. जर सरकारने एकरी पन्नास हजार मदत दिली नाही तर यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन 4 डिसेंबरला करु असा इशारा माजी आमदार वैभव पिचड यांनी दिला.