Breaking News

ग्रामसेवक पतसंस्थेमुळे सभासदांची दिवाळी गोड - एकनाथ ढाकणे

ग्रामसेवक पतसंस्थेमुळे सभासदांची दिवाळी गोड - एकनाथ ढाकणे
-----------
ग्रामसेवक पतसंस्थेच्या वतीने सभासदांना पंधरा किलो साखर वाटप.


पारनेर प्रतिनिधी - पारनेर पंचायत समिती मध्ये ग्रामसेवक पतसंस्थेच्या वतीने सभासदांना 15 किलो साखर वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ग्रामसेवक संघटनेचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
दिवाळीनिमित्त पतसंस्थेने प्रत्येक सभासदाला 15 किलो साखर वाटप करण्यात आली संस्थेचे चेअरमन राजेंद्र पावशे जिल्हा परिषद कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील नागरे उपस्‍थित होते यावेळी बोलताना सुनिल नागरे म्हणाले की राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांच्या संकल्पनेनुसार ग्रामसेवकाची दिवाळी गोड व्हावी या भावनेतून संस्थेचे उत्तरदायित्व या ध्येयाने साखर वाटप केलेली आहे व संस्थेच्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली तसेच 26 नोव्हेंबर रोजी राज्य सरकारी कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि ग्रामसेवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने संप यशस्वी करण्याचा निर्धार केला
चेरमन राजेंद्र पावसे यांनी आपल्या खास शैलीत पतसंस्थेच्या कामकाजाची भूमिका विशद करून सभासदांच्या  हितासत्व संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली 24तासात कर्ज वितरण करणारी महाराष्ट्रात एकमेव व पतसंस्था असल्याचे सांगून विमासंरक्षण ऑडिट वर्ग साखर वाटप आदी उपक्रम व सेवेची माहिती दिली दीपावली निमित्त सर्व संचालक मंडळाच्या वतीने पारनेर तालुक्यातील सर्व सभासद महिला भगिनींना आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी ग्रामसेवक युनियनच्या  
सारिका वाळुंज तालुकाध्यक्ष ग्रामसेवक संघटना पारनेर शशी नरोडे युवा नेतृत्व तालुका सचिव पारनेर तालुका ग्रामसेवक संघटना जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सचिव याठिकाणी उपस्थित होते  उपस्थित सर्व मान्यवरांचे सारिका वाळुंज  रामदास सांगळे यांनी आभार मानले.