Breaking News

राज ठाकरेंचा साधेपणा

 


मुंबई, : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषणातली फटकेबाजी सर्वश्रूत आहे. त्यांचा रांगडा स्वभाव पत्रकार आणि तमाम कार्यकर्त्यांना चांगलाच परिचित आहे. पण राज ठाकरे यांच्यातला साधेपणा आज पुन्हा एकदा पाहण्यास मिळाला.

राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे नेहमी प्रमाणे शिवाजी पार्कामध्ये टेनिस खेळण्यासाठी येत असतात. गुरुवारी सुद्धा राज ठाकरे टेनिस खेळण्यासाठी आले होते. त्यावेळी शिवाजीपार्क परिसरात काम करणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे त्यांच्यासोबत फोटो काढण्याची विनंती केली.

राज ठाकरे यांनीही कर्मचाऱ्यांच्या विनंतीला मान दिला फोटो काढण्यासाठी पुढे आले. फोटो काढत असताना राज ठाकरे यांनी मोठ्या मनाने कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि दिलखुलासपणे फोटो काढला.