$type=ticker$snippet=hide$cate=0

वनडे मालिकेआधी दिग्गजाने दिली चेतावणी

  वनडे मालिकेआधी दिग्गजाने दिली चेतावणी २७ नोव्हेंबरपासून भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होत आहे. जवळपास अडीच महिन्याच्या या द...

 

वनडे मालिकेआधी दिग्गजाने दिली चेतावणी

२७ नोव्हेंबरपासून भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होत आहे. जवळपास अडीच महिन्याच्या या दौऱ्यात ३ वनडे, ३ टी२० आणि ४ कसोटी सामन्यांच्या मालिका होणार आहेत. पण नेहमीप्रमाणे दौऱ्यातील सामन्यांना सुरुवात होण्याआधी आजी-माजी क्रिकेटपटूंमध्ये शाब्दिक वार सुरु झाले आहेत. आता ऑस्ट्रेलियाचे सहाय्यक प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनल्ड यांनी वनडे मालिका सुरु होण्याआधी भारतीय गोलंदाजांना एक चेतावणी दिली आहे.

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ न्यूझीलंडच्या निल वॅगनरने टाकलेल्या बाउंसरमुळे त्रस्त झाला होता. तसेच तो जोफ्रा आर्चरने टाकलेल्या शार्ट चेंडूवरही संघर्ष करताना दिसला होता. आता भारतीय संघातील गोलंदाजही स्मिथविरुद्ध शॉर्ट लेंथचे चेंडू टाकण्याची योजना आखू शकतात. पण मॅकडोनल्ड यांनी म्हटले आहे की स्मिथ त्यावर मात करेल. सातत्याने स्मिथवर बाउंसरचा मारा करण्याची योजना चुकू शकते.

स्मिथच्या फलंदाजीमध्ये कोणतीही कमजोरी दिसून येत नाही - मॅकडोनल्ड

मॅकडोनल्ड म्हणाले की स्मिथच्या फलंदाजीमध्ये कोणतीही कमजोरी दिसून येत नाही. ते म्हणाले, 'मला माहित आहे की कसोटी सामन्यात आर्चरचा चेंडू त्याच्या हेल्मेटला लागला होता. पण त्यानंतर तो धावा करण्यात यशस्वीही झाला होता. वनडे आणि टी20 मध्येही त्याच्या विरुद्ध ही योजना वापरण्यात आली. पण तो धावा करण्यात यशस्वी झाला. म्हणूनच ही त्याची कमजोरी समजणार नाही. जर भारतीय गोलंदाजांना ही योजना राबवायची असेल तर ते राबवू शकतात.'

भारताची योजना स्मिथने ठरवली होती निष्फळ

यावर्षी जानेवारीमध्ये 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत स्मिथच्या विरुद्ध भारतीय संघाने शॉर्ट लेंथचे चेंडू टाकण्याची योजना वापरली होती. पण स्मिथने तेव्हा 98 आणि 131 धावांची खेळी केली होती.

मॅकडोनल्ड म्हणाले, 'त्याने या योजनेवर काम केले आहे. ही योजना धावांना रोखण्यात आणि त्याला बाद करण्याची चांगली संधी देते. पण भारताविरुद्ध मागच्या मालिकेत तो या आव्हानाला सहज पार करुन गेला होता. मला वाटते येणाऱ्या मालिकेतही असेच होईल.'

स्मिथचा भारताविरुद्ध होणाऱ्या वनडे, टी20 आणि कसोटी अशा तिन्ही मालिकांसाठी ऑस्ट्रेलिया संघात समावेश आहे.

 

Name

] ब्रेकिंग,850,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5545,letest News,584,Loksabha-2019,164,Maharashtra,103,Mumbai,41,New Window,210,News,314,satara,2,updates,452,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,137,अहमदनगर,9957,औरंगाबाद,355,क्रीडा,675,दखल,659,देश,4146,नाशिक,776,पुणे,588,बीड,1423,बुलढाणा,858,ब्रेकिंग,15343,ब्रेकिंग न्युज,112,मनोरंजन,155,महाराष्ट्र,12434,महाराष्ट्र सातारा,22,मुंबई,3439,विदेश,635,संपादकीय,1463,सातारा,3155,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: वनडे मालिकेआधी दिग्गजाने दिली चेतावणी
वनडे मालिकेआधी दिग्गजाने दिली चेतावणी
https://assets-news-bcdn.dailyhunt.in/cmd/resize/400x400_80/fetchdata16/images/4f/09/dd/4f09dd2baec30162b691ee05cf1c3680c07c32721058cbbf07f9eaeb411d577a.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_552.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_552.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content