Breaking News

भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

 

भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : घरात गांजा सापडल्यानंतर कॉमेडियन भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया या दोघांना एनसीबीने अटक केली होती. त्यानंतर आज त्यांना मुंबईच्या किल्ला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आहे. भारती आणि हर्ष यांच्यासोबतच इतर दोन ड्रग्ज पेडलर्सनाही कोर्टासमोर हजर करण्यात आलं असून दोघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आता या दोघांनीही जामिनासाठी अर्ज केला असून उद्या त्यांच्या जमीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

दोघांच्या घरातून 86.5 ग्रॅम गांजा जप्त
एनसीबीने भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या घरावर छापा टाकला होता. या छाप्यात दोघांच्या घरात 86.5 ग्रॅम गांजा सापडला. घरात गांजा सापडल्यानंतर दोघांनाही प्रथम एनसीबीने अटक केली. तर शुक्रवारी एक ड्रग पॅडलरला पकडण्यात आले. तर भारती आणि हर्ष या दोघांचीही चौकशीत आधी भारती आणि हर्ष दोघेही एकत्र गांजा सेवन केल्याची कबुली दिली.

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणापासून ड्रग्ज कनेक्शनमध्ये गेल्या सहा महिन्यात अनेक सेलिब्रिटींची नावं समोर आली आहेत. यामध्ये गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीपासून याची सुरुवात झाली आणि त्यानंतर दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, अर्जुन रामपाल, त्याची गर्लफ्रेन्ड गॅब्रिएला डेमेट्रिएड्स यांच्यासह अनेक नावं समोर आली आणि त्यांची चौकशीही झाली.