वरली मटका बहाद्दरांनी वर्दळीच्या ठिकाणी थाटले दुकान बुलडाणा/पुरुषोत्तम बोर्डे बुलढाणा शहरात अवैध धंद्यांना ऊत आला असून शहरांमध्ये अराजकता म...
वरली मटका बहाद्दरांनी वर्दळीच्या ठिकाणी थाटले दुकान
बुलडाणा/पुरुषोत्तम बोर्डे
बुलढाणा शहरात अवैध धंद्यांना ऊत आला असून शहरांमध्ये अराजकता माजली आहे शहरातील अनेक चौकात मोक्याच्या जागांवर वरलीमटका बहाद्दरांनी आपली दुकाने थाटली आहेत त्यातील सर्वात मोठा वर्दळीचा रस्ता असलेल्या संगम चौक ते शिवाजी शाळा रोड वर अगदी स्वर्ण गणेश मंदिराच्या समोरच वरलीमटका बहाद्दरांनी आपले भले मोठे दुकान थाटले आहे या दुकानांकडे पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे अशी चर्चा सर्वत्र होत आहे
शहरात अनेक ठिकाणी मटका जुगार राजरोसपणे विक्री ही पोलीस प्रशासनाच्या सहकार्यामुळे चालू आहे वर्दळीच्या ठिकाणी अनेक विद्यार्थी महिला यांना रस्त्याने जाताना त्रास होत आहे यातून छेडछाडीची प्रकरणे वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आ हे
यामुळे शहरातील शांतता भंग पावल्याचे दिसत आहे यामध्ये अनेक तरुण पिढी बरबाद होताना दिसत आहे अनेकांचे मटका दुकानांमध्ये आर्थिक नुस्कान होत असून आत्महत्या सारखे प्रकरणे वाढत आहे तर नगरपालिका प्रशासन या अवैध धंद्या वाल्या चे अतिक्रमण याकडे संपूर्ण दुर्लक्ष करताना दिसत आहे जर एखादा गोरगरीब आणि रस्त्यावर टपरी किंवा छोटे दुकान टाकले तर अवैध अतिक्रमण म्हणून नगरपालिकेकडून गरीबाची टपरी लगेच उचलून नेऊन त्यांच्यावर कार्यवाही केली जाते मग अवैध धंदे वाल्यांचा अतिक्रमण कडे नगरपालिका दुर्लक्ष का करते असा खडा सवाल जनतेकडून उपस्थित होत आहे तर वरली वाल्यांवर गुन्हे दाखल का करण्यात येत नाही असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे यावली वाल्यांवर पोलीस प्रशासन कोणतीही कार्यवाही करत नसल्याने व पोलिसांचा कोणताही धाक यावरील वाल्यांना राहिला नसून उलट त्यांचा उत्साह वाढताना दिसत आहे काही व्यावसायिकांचे तर अनेक ठिकाणी वेगवेगळी दुकाने आहेत त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे उलाढाल होत असल्याचे पहायला मिळत आहे यातून अनेकांचे आर्थिक नुस्कान होत असून अनेकांचे घरे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे वर्दळीच्या ठिकाणी असलेली अवैध धंदे तात्काळ बंद करावेत अशी मागणी जनतेकडून होत आहे आता मात्र पोलीस काय भूमिका घेतात याकडे त्यांचे लक्ष लागले आहे