Breaking News

अर्णव गोस्वामींना हायकोर्टातून दिलासा नाही!

- जामीनअर्जावर उद्या पुन्हा सुनावणी


मुंबई : पत्रकार अर्णव गोस्वामी यांना शुक्रवारीही मुंबई  उच्च न्यायालयात दिलासा मिळाला नाही. त्यांच्या जामीनअर्जावर आता शनिवारी दुपारी 12 वाजता सुनावणी होणार असून, जामीन मिळणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गोस्वामी यांनी अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी जामीन मिळावा आणि एफआयआर रद्द करावा म्हणून याचिका दाखल केली होती. त्यावरील युक्तिवाद पूर्ण न झाल्याने ही सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. तर, अलिबाग पोलिसांनीही अलिबाग सत्र न्यायालयात याचिका दाखल करून अर्णव यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी केली आहे. त्यावरही शनिवारी सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे शनिवारी मुंबई उच्च न्यायालय आणि अलिबाग सत्र न्यायालयात काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------------