Breaking News

पदभार स्वीकारताच घनश्याम बळप त्यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्या गुन्ह्यातील आरोपी अटक.

पदभार स्वीकारताच घनश्याम बळप त्यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्या गुन्ह्यातील आरोपी अटक.
---------------
तहसीलदार व पथकाच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न केलेल्या आरोपीस पोलिसांनी केली अटक.
--------------
घनश्याम बळप यांच्या धडक कारवाईमुळे तालुक्यातील अवैध व्यवसायिक व गुन्हेगारांचे धाबे दणाणले.


पारनेर प्रतिनिधी -
 गेल्यावर्षी तहसीलदार ज्योती देवरे या पथकासह वाळू कारवाईसाठी गेले असता वाळूचा भरलेला डंपर त्यांच्या समोर रस्त्यावर सोडून देत शासकीय कामात अडथळा आणून पथकातील लोकांच्या जीवितास धोका निर्माण केला या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला होता या प्रकरणातील दोन आरोपीस यापूर्वीच अटक केले होते त्यातील तिसरा आरोपी आकाश कृष्णा रोहकले अनेक दिवस फरार होता यास नव्याने हजर झालेले पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की दि.२५ नोव्हेंबर २०१९ रोजी तहसीलदार यांच्या पथकाला ढवळपुरी शिवारात शासकीय वाळूची चोरी करून त्याची वाहतूक करत असताना डंपर आढळून आला त्यानंतर पथकाने डंपरचा पाठलाग केला मात्र डंपर मधील वाळू रस्त्यावर सोडून देऊन शासकीय कामात अडथळा आणून पथकाच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी तहसीलदार यांनी स्वतः फिर्याद दिली होती त्यानुसार आरोपी अक्षय दौलत पाडळे वय २५ रा. हिंगणगाव ता. नगर ,आकाश कृष्णा रोहकले वय २७ रा. भाळवणी ता. पारनेर,बापू बन्सी सोनवणे वय २९ रा. हिंगणगाव ता. नगर या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील आरोपी बापू बन्सी सोनवणे यास उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता तसेच आरोपी अक्षय दौलत पाडळे त्यालादेखील १५ ऑगस्ट रोजी अटक केली होती सध्या तो जामिनावर आहेत मात्र यातील आरोपी आकाश कृष्णा रोहकले हा बरेच दिवस फरार होता नव्याने आलेले पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी प्रलंबित प्रकरणांमध्ये लक्ष घातले त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल सत्यजित शिंदे महादेव पवार राम मोरे व अनिल रोकडे यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने या आरोपीस ताब्यात घेतले त्यानंतर त्यास आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले आरोपीस न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
 पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी पारनेर पोलीस स्टेशन चा पदभार स्वीकारताच गुन्हेगारांची गय केली जाणार नाही तसेच अवैध व्यवसाय पूर्ण बंद केले जातील असा इशारा दिला होता त्यानुसार त्यांनी त्यादृष्टीने कार्यवाहीस सुरुवात केली आहे अनेक प्रकरणांमध्ये ते स्वतः लक्ष घालून त्याचा छडा लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यामुळे अनेक गुन्हे उघडकीस येतील पदभार स्वीकारताच बळप त्यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्या गुन्ह्यातील आरोपीला अटक केली आहे त्यामुळे तालुक्यातील अवैध व्यवसायिक वाळू माफिया व गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.