Breaking News

पारनेर पोलिसांच्या कारवाईत ११०६९ रुपयाची दारू जप्त

पारनेर पोलिसांच्या कारवाईत ११०६९ रुपयाची दारू जप्त.
----------
पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात अवैध  व्यवसायिकांच्या विरोधात कारवाईची धडक मोहीम.


पारनेर प्रतिनिधी-
 पारनेर पोलिसांनी तालुक्यात विविध भागात टाकलेल्या छाप्यात गावठी हात भट्टी दारू तसेच देशी-विदेशी दारू आढळून आली यामध्ये ११०६९ रुपयाची दारू पोलिसांनी जप्त केली आहे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी अवैध व्यवसाय याविरोधात मोहीम हाती घेतली आहे त्यामुळे  नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार देवीभोयरे फाटा येथील हॉटेल जय मल्हार येथे दि.११ रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला यावेळी आरोपी विशाल बाळू माकर  सुनील बबन माकर दोघेही रा.ढोकसांगवी ता.शिरूर जि पुणे हे त्यांच्या मालकीच्या हॉटेलमध्ये ५२२० रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारू विनापरवाना त्याच्या स्वतःच्या फायद्याकरता विक्री करताना आढळून आला. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सत्यजित सोनाजी शिंदे यांनी दिली आहे त्यानुसार पारनेर पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात वडझिरे येथे आरोपी बजरंग अमृता दिघे वय ६५ हा स्वतःच्या फायद्या करिता आपल्या घराच्या आडोशाला १५०० रुपये किमतीची हातभट्टी आंबट उग्र वासाची १५ लिटर दारू चोरून विक्री करताना मिळून आला या बाबतची फिर्याद सत्यजित शिंदे यांनी दिली असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
या दोन्ही घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल एस. जी.रोकडे करत आहेत.
तसेच हॉटेल कुंडमाऊली च्या मागे देशी देशी दारू ची चोरून विक्री करत असताना आरोपी बाबाजी शंकर ठुबे यास पोलिसांनी ताब्यात घेतली त्याच्याकडून ९२४ रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे सांगवी सूर्या येथील जगदंब हॉटेल मध्ये टाकलेल्या छाप्यात १४०६ रुपयाची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली 
येथीलच हॉटेल पान वारा येथून पोलिसांनी २०१९ रुपयांची दारू जप्त केली आहे याठिकाणी पोलीस उपनिरीक्षक विनयकुमार बोत्रे यांच्या नेतृत्वाखाली छापे टाकण्यात आले.