भारतात या दिवशी प्रदर्शित होणार 'टेनेट'; डिंपल कपाडिया यांनी केली घोषणा बहुप्रतिक्षित क्रिस्टोफर नोलन यांचा टेनेट हा चित्रपट ४ डिस...
भारतात या दिवशी प्रदर्शित होणार 'टेनेट'; डिंपल कपाडिया यांनी केली घोषणा
बहुप्रतिक्षित क्रिस्टोफर नोलन यांचा टेनेट हा चित्रपट ४ डिसेंबर रोजी भारतात प्रदर्शित होणार (Tenet Movie Will Release On 4th December In India) आहे. कोरोना विषाणूमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन लांबले होते. तर आता दीर्घप्रतिक्षेनंतर चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. यासंदर्भात बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी एका व्हिडिओद्वारे चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. डिंपल यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे.
ट्वींकल खन्नाने आपली आई डिंपल कपाडियाचा एक व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओत डिंपल हा चित्रपट भारतात कधी प्रदर्शित होणार आहे याबाबत सांगत आहेत. डिंपल यांनी व्हिडिओत म्हटले की, 'शेवटी प्रतीक्षा संपली. मला ही घोषणा करताना आनंद होत आहे की, क्रिस्टोफर नोलन यांचा 'टेनेट' हा चित्रपट ४ डिसेंबर रोजी भारतातील सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. या प्रोजेक्टसोबत जोडले गेल्याने माझ्यासाठी ही एक सन्माननीय गोष्ट आहे.
कोरोना विषाणूच्या लॉकडाऊनंतर टेनेट हा चित्रपट पहिल्यांदा ऑगस्ट महिन्यात इंग्लडमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर जवळपास संपूर्ण देशात हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. लंडनमध्ये जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता तेव्हा अभिनेता टॉम क्रूज आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर अशा कमी कलाकारांपैकी एक होते ज्यांनी सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट पाहिला होता. त्यानंतर आता शेवटी हा चित्रपट भारतात प्रदर्शित होत आहे. क्रिस्टोफर नोलनद्वारा लिखित आणि दिग्दर्शइत या चित्रपटात डिंपल यांच्यासोबत जॉन डेविड वॉश्गिंटन, रॉबर्ट पेटिंसन, माइकल केन, हिमेश पटेल, एलिझाबेथ डेबिकी दिसणार आहेत.