पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग आणि होणाऱ्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर लोकं मेल्यावर लस येईल का? असा उद्...
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग आणि होणाऱ्या मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर लोकं मेल्यावर लस येईल का? असा उद्विग्न सवाल केला आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कोरोना नियंत्रणासाठी प्रशासनाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांविषयी माहिती दिली. तसेच सध्या सरकारची तारेवरची कसरत सुरु असल्याचं सांगितलं.
यावेळी अजित पवार यांनी दिवाळीच्या काळात पुण्यातील बाजीराव रोड आणि लक्ष्मी रोड परिसरातील गर्दीवरुन पुणेकरांना चांगलेच टोले लगावले. दिवाळीत झालेल्या गर्दीमध्ये कोरोना चेंगरून मेला, असं खोचक टोला पवारांनी लगावला. अजित पवारांचा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जारी केलेल्या सूचनांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर नाराजी व्यक्त केली. तसेच नागरिकांनी नियमांचं पालन करावं, असं आवाहन केलं.