Breaking News

एकवेळ म्हशीचे हंबरणे चालेल; पण अमृता फडणवीसांचे गाणे नको!

- महेश टिळेकरांची जळजळीत टीका 


मुंबई/ प्रतिनिधी

विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे भाऊबीजच्या निमित्ताने एक गाणे रिलीज झाले आहे. अमृता यांनी या गाण्याला स्वरसाज चढवला आहे. परंतु, या गाण्यावर प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता महेश टिळेकर यांनी टीका केली असून, म्हशीचे हंबरणे चालेल पण अमृता फडणवीसांचे गाणे नको, असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याला सोशल मीडियावर जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

अमृता यांच्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे गाणे ऐकल्यानंतर नेटकर्‍यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. आता महेश टिळेकर यांनीदेखील त्यांच्या गाण्यावर टीका केली. महेश म्हणाले, एकवेळ गायी म्हशीच्या हंबरण्याचा आवाज लोक सहन करतील पण हा आवाज सहन होत नाही. अमृत फडणवीस यांना खरेच गाता येते का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.