महसुल, वन व पोलिस प्रशासनाला पुर्व सुचना देवूनही दुर्लक्ष पारनेर/प्रतिनिधी ः निघोज महसुल मंडळातील वडगाव गुंड येथील सुपात्या डोंगराला काही स...
महसुल, वन व पोलिस प्रशासनाला पुर्व सुचना देवूनही दुर्लक्ष
पारनेर/प्रतिनिधी ः निघोज महसुल मंडळातील वडगाव गुंड येथील सुपात्या डोंगराला काही समाजकंटकांनी रात्री आग लावली. पावसाळ्यात येथील डोंगरावर भैरवनाथ मंदिर ग्रामविकास ट्रस्ट, वडगाव ग्रामविकास प्रतिष्ठाण व लोकजागृती सामाजिक संस्था यांनी सुमारे 1700 विविध जातीच्या वृक्षांची लागवड केली आहे. यामधे 400 विविध जातींच्या औषधी वनस्पतींच्या प्रजाती आहेत. तर काही दुर्मीळ जातीचे वृक्षसंवर्धन येथे केलेले आहे. यातील सुमारे 1500 रोपांना संरक्षक जाळीचे कुंपण बसवून ठिबक सिंचन करण्यात आले आहे. पाण्याच्या सुविधेसाठी कुकडी कालव्याजवळील विहिरीवरून 10 हॉवर्स पॉवरचा पंप बसवून 10 लाख लिटर क्षमतेचे कागद बसवून शेततळेही तयार केलेले आहे. येथे सुमारे दोन किलोमीटरचा धावण्याचा ट्रॅक तयार केला आहे. यासाठी आजपर्यंत जवळपास सुमारे अठरा लाख रुपये खर्च झाला आहे. येथील सुपाईमाता या देवस्थानाचे छोटेशे मंदिराचे कामही भाविकांनी चालु केले आहे.हा सर्व खर्च लोकसहभागातुन ग्रामस्त व पर्यावरणप्रेमींनी केला आहे. या सर्व 24 एकरच्या सुपात्या पठारावर हा समाजहिताचा प्रकल्प उभा राहत असताना येथील काही समाजकंटनां ते पाहवत नसल्याने त्यांनी या पुर्वी या प्रकल्पाला विरोध केला होता. त्याबाबत तक्रार प्रशासनाकडे गेल्या महिन्यात केलेली होती, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे काल रात्री येथे आग लावून हा प्रकल्प नष्ट करण्याचा प्रयत्न समाजकंटक करत आहेत. त्यांच्यावर शोध घेवून कारवाई होण्याची मागणी आम्ही करत आहे. येथील डोंगरावर दररोज सकाळी व्यायाम, प्राणायाम करण्यासाठी दररोज शंभरहुन अधिक नागरीक येत आहेत.त्यांच्या श्रमदानातुन एक चांगला प्रकल्प येथे आकार घेत असताना त्याला विरोध केला जातो आहे.