Breaking News

पारनेर तालुक्यात दोन दिवसात ३०अहवाल पॉझिटिव्ह.

पारनेर तालुक्यात दोन दिवसात ३०अहवाल पॉझिटिव्ह.
----------
देवीभोयरे येथे १२ तर मोरवाडीत ८ अहवाल पोझिटिव्ह.


पारनेर प्रतिनिधी -
 पारनेर तालुक्यातील गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे मात्र दोन दिवसांच्या कोरोना चाचणीच्या अहवालामध्ये ३० व्यक्तींना कोरोना ची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दि.३० रोजी च्या पॉझिटिव अहवालामध्ये १८ व्यक्तींचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव प्राप्त झाले यात देवीभोयरे १२ गडदवाडी १ लोणी हवेली १ कान्हुर पठार १ पारनेर १ नारायणगव्हाण १ डिकसळ १ या गावातील व्यक्तींचा पॉझिटिव्ह यामध्ये समावेश आहे.
तर दि. ३१ रोजी बारा अहवाल पॉझिटिव प्राप्त झाले यामध्ये मोरवाडी(निघोज) ९ कान्हूर पठार १ लोणी हवेली १ पिंपळनेर १ आहे.
तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी काही गावांमध्ये अचानक रुग्ण संख्या वाढत आहे त्यामध्ये देवीभोयरे या गावात दि. ३० रोजी बारा व्यक्तींना कोरोना ची लागण झाली तसेच ३१ रोजी मोरवाडी(निघोज) येथे नऊ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे तसेच सातत्याने रुग्णसंख्या सापडणाऱ्या गावांमध्ये कान्हूर पठार लोणी हवेली व पारनेर शहर यांचा समावेश आहे. या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे तसेच नागरिकांनीदेखील प्रशासनाने घालून दिलेली नियमावलीचे पालन केले पाहिजे.