वर्दळीचे ठिकाण सोडून पोलिसांचा दुसरीकडेच दंड वसुली राहुरी/शहर प्रतिनिधी ः राहुरी महार्माावर प्रचंड गर्दी असणार्या या चौकात वाहतूक पोलिस...
वर्दळीचे ठिकाण सोडून पोलिसांचा दुसरीकडेच दंड वसुली
राहुरी/शहर प्रतिनिधी ः राहुरी महार्माावर प्रचंड गर्दी असणार्या या चौकात वाहतूक पोलिसांनी आपला डेरा टाकला आहे. मात्र एकाच बाजून जाणार्या वाहन चालकांकडून नियम मोडल्याबद्दल दंड वसूल करण्यात येत आहे. मात्र वर्दळीच्या ठिकाणी वाहतुक सुरळीत करण्यासाठी, किंवा नियम मोडणार्याविरोधात पोलिस कारवाईचा बडगा उचलत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि चीड निर्माण होत आहे.
मार्च महिन्यात कोरोनाकाळापासून राहुरी येथील बसस्थानक चौकात (राजमाता जिजाऊ चौक ) येथे राहुरी पोलिसांनी तपासणी नाका सुरू केला आहे. याठिकाणी नगर, शिर्डी - शनिशिंगणापूर हमरस्त्यासह म्हैसगाव, मल्हारवाडी आणि राहुरी शहरातील ये-जा करणार्या वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. या मल्हारवाडी चौकात एमपी सोसायटी संस्थेसमोर एका उंबराच्या झाडाखाली पोलिसांनी सध्या आपला डेरा लावला आहे. येथील नेमण्यात आलेले पोलिस नगरकडील रस्त्याकडून बसस्थानकाच्या दिशेकडे जाणार्या वाहनचालकांना थांबवून नियम मोडणार्या वाहनचालकांकडून दंड वसुली करताना दिसत आहे. दोन ट्राफिक पोलीस, एक स्थानिक पोलिस, दोन सहाय्यक होमगार्ड, असे हे पथक ही कारवाई दिवसभर करतात. ा मात्र दुसर्या बाजूला चौकात मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाल्यावर मात्र हे नेमलेले पोलिस तिकडे फिरकताना दिसत नाहीत! दुसर्या बाजूला शहरात ये-जा करणारे आणि बस स्थानक चौकातून नगरच्या दिशेला जाणार्या एकाही वाहनचालकाची नियम मोडल्याबद्दल मोहीम राबवली जात नसल्याचे दिसून येत आहे. शहरवासीय व वाहन चालक मात्र संभ्रमात पडले आहेत. पोलीस चौकी असल्यासारखे उंबराच्या झाडाखाली पोलीस तळ ठोकून असतात. गाड्या अडवल्याने आणखी गाड्या थांबल्याने वाहतुकीचा खोळंबा होताना दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी या झाडाखाली पोलीस चौकी सुरू केली काय ? असा सवाल विचारला जात आहे. आश्चर्य असे की, ही जागा एका चहाहॉटेल शेजारी आहे. आणि दंड वसूल करण्यासाठी टेबल म्हणून फळविक्रेतेचा कॅरेटचा वापर होत आहे. वाहनचालकांना अडवल्याने होणारी गर्दी व वेळकाढूपणा यातून या पोलिस पथकाला काय साध्य करायचे आहे? असा सवालही नागरिक विचारत आहेत. नियम मोडणार्यांना दंड वसुली आवश्यक करावी, मात्र दोन्ही बाजूला होणे आवश्यक आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी यात लक्ष घालतील काय? असा प्रश्न विचारला जात आहे.