$type=ticker$snippet=hide$cate=0

विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत शिक्षण सुरु

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती  मुंबई : देशभरातच नव्हे तर जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शिक्षणाचा खेळ खंडोबा झाला असल...



शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती 

मुंबई : देशभरातच नव्हे तर जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शिक्षणाचा खेळ खंडोबा झाला असला तरी देखील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत शिक्षण सरु ठेवायचे असल्याचे मत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले.  

जगभरातल्या दोनशेहून अधिक देशांमध्ये कोरोनाच्या महामारीमुळे व्यवहार बंद झाले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न असल्याने शाळा आणि महाविद्यालयेही बंद करण्यात आली. मात्र, यावर काहीतरी तोडगा काढणे महत्त्वाचे असल्याने ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय पुढे आला. अजूनही अनेक भागात शाळा सुरू नाहीत. पण ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. राज्यातल्या शाळा बंद असल्या तरी सरकारच्या पुढाकाराने दीक्षा अ‍ॅप सुरू केले. या अ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन करण्याचा उपक्रम सुरू केला. याचा आज हजारो विद्यार्थी लाभ घेत असल्याचे शिक्षण मंत्री गायकवाड यांचे म्हणणे आहे. प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू करणे, हे सरकारपुढे मोठे आव्हान होते. मात्र जिओ टीव्हीवर इयत्ता 3 ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रसारण करण्यात आले. जिओ सावन या रेडिओ वाहिनीवरही शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. आपल्या सरकारी सह्याद्री वाहिनीवर पहिली ते आठवीसाठी ’टिलीमिली’ हा शैक्षणिक कार्यक्रम सुरू करण्यात आला. गुगलच्या साहाय्याने क्लासरूम उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचा उल्लेख शिक्षण मंत्र्यांनी केला. दरम्यान, राज्य संकटात असताना विरोधकांनी राजकारण केले. सरकारला मार्गदर्शक सूचना करण्याऐवजी विरोधकांनी संकटाचे भांडवल करण्यास सुरुवात केली. शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावर पेच निर्माण झाला असताना जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. यातूनही मार्ग काढू, असेही गायकवाड यांनी सांगितले.  तीन विभिन्न विचारसरणीचे सरकार आहे. यात मतभेद नाहीत असे नाही. पण किमान समान कार्यक्रमांतर्गत चर्चेतून तोडगा काढून सरकार चालवावे लागत आहे. हे सरकार चालवताना विकासाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येईल आणि सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असेही काँग्रेसच्या नेत्या आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. शाळा नियमित कधी सुरू होणार याबाबत आताच काही सांगता येणार नाही. गेले आठ महिने शाळा, महाविद्यालये सुरू नाहीत. मात्र, आता जिल्हा प्रशासनाला शाळा सुरू करण्यासाठी परिस्थितीजन्य निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत आहे. शाळा नियमित कधी सुरू होणार हे मात्र आताच सांगता येणार नाही, असेही गायकवाड यांनीं स्पष्ट केले. 

------------------------------


Name

] ब्रेकिंग,852,Agralekh,3,desh,2,IPL 2020,19,Latest News,5573,letest News,588,Loksabha-2019,164,Maharashtra,108,Mumbai,41,New Window,210,News,316,sangli,3,satara,14,updates,453,Videsh,2,Vishesh,2,अर्थ,141,अहमदनगर,10035,औरंगाबाद,356,क्रीडा,676,दखल,667,देश,4194,नाशिक,779,पुणे,623,बीड,1425,बुलडाणा,3,बुलढाणा,864,ब्रेकिंग,15529,ब्रेकिंग न्युज,113,मनोरंजन,158,महाराष्ट्र,12640,महाराष्ट्र सातारा,35,मुंबई,3478,विदेश,637,संपादकीय,1477,सातारा,3169,
ltr
item
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates: विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत शिक्षण सुरु
विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत शिक्षण सुरु
https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/1103x827/assam-1584259559_202006435257.jpg
लोकमंथन : Lokmanthan : Latest Marathi News Live, Marathi News Updates
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_658.html
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/
https://www.lokmanthan.com/2020/11/blog-post_658.html
true
1708963956808886337
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content