आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली. प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं प...
आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली. प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचले होते. त्यानंतर ईडीने विहंग सरनाईक यांना ईडीनं ताब्यात घेतल्याचं समोर आलं होतं. यावरून आता आरोप प्रत्यारोपांना आणि राजकीय प्रतिक्रियांना सुरूवात झाली आहे.
भाजपा नेते नारायण राणे यांनीदेखील यावर एक प्रतिक्रिया देत अधिक बोलणे टाळले. ‘प्रताप सरनाईक हे काही साधू संत नाहीत,’ असं म्हणत नारायण राणे यांनी त्यांच्यावर टीकेचा बाण सोडला.
ईडी, सीबीआय यांची चौकशी पूर्ण झाल्याशिवाय आपण प्रतिक्रिया द्यायची नसते. प्रताप सरनाईक हे काही साधू संत नाहीत. माध्यमांनी आधी त्यांची माहिती घ्यावी, ईडीचा छापा योग्य अयोग्य हे सांगावं मग आम्ही प्रतिक्रिया देऊ,’ असे नारायण राणे म्हणाले.