Breaking News

पत्नी माहेरी गेली, घरी एकट्या असलेल्या पतीची गळफास घेवून आत्महत्या

 

जळगाव:पत्नी माहेरी गेली अन् घरी एकटे असतांना बांधकाम मजुर प्रदीप सदाशिव महाजन (वय-32) रा. संत मिराबाई नगर या बांधकाम मजूराने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी समोर आली आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रदीप सदाशिव महाजन (वय-32) रा. कळमसरे ता.अमळनेर ह.मु. संत मिराबाई नगर पिंप्राळा हे आपल्या पत्नी व मुलगासह वास्तव्याला आहे. बांधकामच्या ठिकाणी मोलमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कामाच्या निमित्ताने गेल्या तीन ते चार वर्षांपासून जळगावला स्थायिक झाले होत. दिवाळीनिमित्त पत्नी माहेरी गेल्या होत्या. प्रदीप महाजन हे घरात एकटे असतांना त्यांनी घरातील पंख्याच्या हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना शेजारच्यांमुळे उघडकीस आली. माहिती मिळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक शिवाजी धुमाळ , पोलीस कॉन्स्टेबल राहूल पारधी यांनी घटनास्थळ गाठले. व पंचनामा करुन मृतदेह जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी जितेंद्र रविंद्र पाटील वय 32 रा. संत मिराबाईनगर यांच्या खबरीवरुन रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक शिवाजी धुमाळ करीत आहे.