Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे कोरोना पॉझिटिव्ह

 

जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली असून ते उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. आपण मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचार घेणार आहोत, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. यावेळी, माझ्या संपर्कात आलेल्या मंडळींनी कोरोना चाचणी करून घ्यावी, तसेच मी बरा होईपर्यंत कुणीही माझ्या भेटीसाठी येऊ नये, असे आवाहनही एकनाथ खडसे यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे आणि त्यांच्या मुलीलाही करोनाची लागण झाली आहे. रोहिणी खडसे यांनी स्वतःच यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली होती. त्यांची प्रकृती बरी असून त्या खबरदारी म्हणून रुग्णालयातच आहेत. काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी भाजपला जय श्रीराम करत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ आपल्या हातात बांधले आहे.