Breaking News

गुंतवणुकीच्या योजनेतून महिलेला नऊ लाखांना गंडवले

 


अहमदनगर   :-शहरात अनेक व्यावसायिक सोन्यात गुंतवणूक योजना चालवीत आहेत. अनेक बेकायदा सुरु आहेत.

अशाच एका योजनेत कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील एका महिलेला लाखो रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.

यामध्ये महिलेला सोन्याची गुंतवणूक करण्यास सांगितले, व लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. या फसवणूक प्रकरणी शहरातील वैष्णवी अलंकार गृहाचे मालक बाळासाहेब डहाळे व अक्षय डहाळे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात योगिता अजित पवार या महिलेची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यावरून दोघा पिता पुत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी फिर्यादीने म्हंटले आहे कि, आरोपी बाळासाहेब डहाळे व अक्षय डहाळे यांनी ज्वेल गोल्डी प्रा. लि. स्कीम योजना वैष्णवी अलंकार गृहा मार्फत जाहीर केली आहे.

या योजनेत १० ग्राम सोन्याला एक महिन्याला १ हजार रुपये मिळतील असे सांगितले. यानंतर खोटा विश्वास व खात्री देऊन २९ तोळे १३ मिली ग्राम सोने व ६० हजार रुपये घेतले.

या सोन्यावर मिळणारी रक्कम न देता या रकमेचे स्कीममध्ये सोने वाढविले आहे असे खोटे सांगितले. त्यांनी संगनमताने ९ लाख ३३ हजार ९०० रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार २०१६ पासून चार वर्ष चालू होता असे फिर्यादीत म्हंटले आहे.

-------------------------