Breaking News

तहसिल कार्यालयासमोर किसान सभा व कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने उद्या निदर्शने.

तहसिल कार्यालयासमोर किसान सभा व कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने उद्या निदर्शने.
-----------
कांदा आयात बंद करावी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान भरपाई मिळावी आदी मागण्यांसाठी तहसीलदार यांना देण्यात येणार निवेदन.
------------
माजी जिल्हा परिषद आझाद ठुबे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून देण्यात येणार निवेदन.


पारनेर प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गुरुवार दि.५ रोजी दु.१२.३० वा. पारनेर तहसील कार्यालयासमोर माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करुन तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.


शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत  त्याला वाचा फोडण्यासाठी किसान सभा व कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निदर्शने  करण्यात येणार आहेत यामधील प्रमुख मागण्या केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय करणारे जे तीन कायदे केले आहेत ते रद्द करावेत,केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करुन व इजिप्त, अफगाणिस्तान व इतर देशांमधून कांदा आयात करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. तरी कांदा आयात बंद करावी,अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे म्हणून शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी.,सन २०१८ रब्बी हंगामातील पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही तो तात्काळ मिळावा,महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कर्ज माफी पासून वंचित असलेले पात्र शेतकरी व नियमित फेड करणारे शेतकऱ्यांना जाहीर केलेली ५०००० ची माफी लवकरात लवकर मिळावी,वीज बिल माफ करण्यात यावी विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारचे शुल्क माफ करण्यात यावे. गेल्या दीड-दोन वर्षांपूर्वी नांगरटी चे पैसे आलेले आहेत मात्र खाते नंबर व इतर काही अडचणींमुळे ते पैसे आद्यप आलेले नाहीत त्याचेही शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप त्वरित करण्यात यावे या व इतर महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन किसान सभेचे अध्यक्ष दादाभाऊ गायकवाड सचिव कैलास शेळके बबनराव गंधात्ते संतोष खोडदे फुलाबाई आदमने गणेश कावरे बबन रावडे यांनी केले आहे.