मुंबई : महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक प्रवेशासाठी जागा तयार करून SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, अशी मागणी खासदार...
मुंबई : महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक प्रवेशासाठी जागा तयार करून SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात संभाजीराजे यांनी पत्र लिहिले आहे.
संभाजीराजे यांनी पत्रात म्हटले आहे की, दि. ९ सप्टेंबर २०२० रोजी सर्वोच्च न्यायालयाने जयश्री पाटील विरुद्ध इतर, महाराष्ट्र सरकार या खटल्यामध्ये महाराष्ट्र सरकारने SEBC Act 2018 अन्वये SEBC प्रवर्गासाठी शैक्षणिक प्रवेशातील १२% आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे. सदरच्या स्थगिती आदेशाच्या पार्श्वभूमीवर SEBC प्रवर्गातील मुलांचा शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील प्रवेशाच्या अधिसंख्य जागा निर्माण करून उपाययोजना करण्यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध आहे.
याचबरोबर, यापूर्वी आपल्यासमवेत झालेल्या बैठकीत देखील ही मागणी केलेली होती, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. असा निर्णय घेताना राखीव व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारे त्याचे हक्क हिरावले जाणार नाहीत. या पद्धतीने इयत्त ११वीच्या प्रवेशाचा मुंबई, पुणे, नागपूर या शहरात निर्माण झालेला प्रश्न सोडवता येईल. विविध राज्यात आर्थिक दुर्बल घटक, ग्रामीण भागातील विद्यार्थी तत्वतःच शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी अधिसंख्य निर्माण करून वेळोवेळी निर्णय वेळोवेळी घेण्यात आलेले आहेत, असे संभाजीराजे यांनी पत्रात नमूद केले आहे.