सज्जनरावांची एन्ट्री लतिकाला त्रासदायक ठरेल का? मुंबई- 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेने प्रेक्षकांच्या मनात चांगलंच स्थान मिळवलं आह...
सज्जनरावांची एन्ट्री लतिकाला त्रासदायक ठरेल का?
मुंबई- 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेने प्रेक्षकांच्या मनात चांगलंच स्थान मिळवलं आहे. लतिका आणि अभि यांच्या आयुष्याला एका अर्थाने सुरुवात झाली आहे. पण त्यांच्यातील नातं प्रेमाने नाही तर कराराने बांधलं गेलं आहे.
सज्जनरावांशी लग्न मोडल्याने आणि बापूंचे पैसे परत न देऊ शकल्याने लतिका आणि अभ्याला एकमेकांशी लग्न करावं लागलं होतं. आता एकमेकांशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात असतानाच आणखी एका व्यक्तीची लतिकाच्या आयुष्यात एंट्री होणार आहे.
लतिकाशी लग्न न झाल्याने दुर्मुखलेल्या सज्जनरावांनी आता वेगळ्याच प्रकारे लतिकाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे. सज्जनराव आता लतिकाच्या बॅंकेचे मॅनेजर बनून आले आहेत. त्यांच्या येण्याने आता लतिकाच्या आयुष्यात कोणतं नवं वादळ येणार हे लवकरच कळेल.
दरम्यान, मालिकेत लतिका बँकेत जॉबला जायला तयार होते. बँकेत गेल्यावर तिला सज्जनरावांना अचानक दर्शन होतं. आता बँकेत नेमकं काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.