'लम्हे' चित्रपटाला २९ वर्षे पूर्ण, अनिल कपूर यांनी सांगितला 'हा' खास किस्सा बॉलिवूडचा झक्कास अभिनेता अनिल कपूर यांचा गाजले...
'लम्हे' चित्रपटाला २९ वर्षे पूर्ण, अनिल कपूर यांनी सांगितला 'हा' खास किस्सा
बॉलिवूडचा झक्कास अभिनेता अनिल कपूर यांचा गाजलेला चित्रपट 'लम्हे' याला रविवारी २९ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट १९९१ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने तेव्हा चांगलेच यश मिळवले होते. या निमित्ताने अनिल कपूर यांनी रविवारी इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचा एक इंटरेस्टिंग किस्सा शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर अनिल यांनी त्यांची पत्नी सुनिता यांच्यासोबतचे २ फोटो शेअर करत पोस्ट लिहिली असून त्यावेळीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
मुलाला आणि पत्नीला केल टॅग - अनिल कपूर यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिलयं की, मी असं म्हणू शकतो की तुम्ही याला आमचा बेबीमून म्हणालं. सुनिता खरं आहे ना हे. हा फोटो लंडनमधील 'लम्हे' या चित्रपटाच्या आउटडोर शूटिंगच्यावेळी घेतला होता. हर्षवर्धन तू सुद्धा तिथेच होता. या जगात येण्याची तेव्हा तू तयारी करत होतास. लम्हे चित्रपटाला २९ वर्षे पूर्ण..! अशा शब्दांमध्ये अनिल कपूर यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. अनिल आणि सुनिता यांना ३ मूले असून सोनम, रिया आणि हर्षवर्धन अशी त्यांची नावे आहेत. त्यातील सोनम कपूर ही अभिनेत्री असून तिचे लग्न झाले आहे तर रिया कपूर ही फॅशन इंडस्ट्रीमध्ये तिची ओळख निर्माण करतेय. हर्षवर्धन कपूर त्याची अभिनेता म्हणून इमेज बनवण्याकरता काम करताना दिसतोय.
कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास अनिल कपूर सध्या चंडिगढमध्ये त्यांचा आगामी चित्रपट 'जुग जुग जियो' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत अभिनेत्री नितू कपूर, किआरा आडवाणी, वरुण धवन इत्यादी कलाकार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज मेहता करत आहेत. या चित्रपटासोबतच अनिल कपूर दिग्दर्शक करन जोहर याच्या 'तख्त' या चित्रपटातही काम करताना दिसणार आहेत.