मुंबई : अभिनेता सोनू सूद पुन्हा एकदा वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात फक्त आपापल्या घरी जाऊ इच्छिणाऱ्यांन...
मुंबई :
अभिनेता सोनू सूद पुन्हा एकदा वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे. सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात फक्त आपापल्या घरी जाऊ इच्छिणाऱ्यांनाच नाही तर अनेकांना वेगवेगळ्या प्रकारची मदत केली. साहजिकच त्याच्याकडे मदत मागण्यासाठी त्याच्या ट्विटर आकाऊंटवर लोकांची रीघ लागलेली होती. मदतीसोबतच नेटकऱ्यांच्या मिश्किल प्रश्नांची मजेशीर उत्तर देण्यासाठीही सोनू सूद चर्चत आला. याचमुळे ‘ट्विटर एंगेजमेंट’च्या शर्यतीत सोनूने आता अक्षय कुमार आणि शाहरुख खानलाही मागे टाकलं आहे.
ट्विटरने राजकारण, पत्रकारिता, व्यवसाय, गुंतवणूक, क्रीडा, चित्रपट, लेखन, स्वयंपाक, कॉमेडी अशा विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या ट्विटर अकाऊंट्सचा रिपोर्ट जाहीर केला. ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक ट्विटर एंगेजमेंट असलेल्यांच्या यादीत सोनू सूदने चौथं स्थान पटकावलं आहे. तर या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर राहुल गांधी, तिसऱ्या स्थानावर विराट कोहली आहे.