सोलापूर : सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाईवर सावध प्रतिक्रिया दिली. 'ईडी...
सोलापूर : सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रताप सरनाईक यांच्यावरील कारवाईवर सावध प्रतिक्रिया दिली.
'ईडीने जर छापा टाकला असेल तर त्यांच्याकडे काही तरी माहिती असेल, काही तक्रारी असतील. त्याशिवाय ईडी छापा टाकत नाही. मी सध्या सोलापूर दौऱ्यावर त्यामुळे सविस्तर माहिती नाही' असं म्हणत फडणवीस यांनी ईडीच्या कारवाईचे स्वागत केले.
तसंच, 'जर चूक काही नसेल तर घाबरण्याचे कारण नाही. मात्र, चूक केली असेल तर संबंधित तपास यंत्रणा योग्य ती कारवाई करेल' असंही फडणवीस म्हणाले.