Breaking News

बिबवेवाडीत जिम ट्रेनरला बदडले; तिघांविरुद्ध गुन्हा दाखलपुणे

 बेंचवर बसलेल्या तरुणाला खुर्चीवर बस असे म्हटल्याचा राग आल्यामुळे त्याने दोन मित्रांच्या मदतीने जीम ट्रेनरला मारहाण केली आहे. ट्रेनरच्या डोक्यात रॉड मारुन त्याला जखमी केले. ही घटना सोमवारी संध्याकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास अंबालाल गुजराती व्यायामशाळा येथे घडली. अजिंक्य संतोष गोळे (रा. धनकवडी ) असे जखमी झालेल्या जिम ट्रेनरचे नाव आहे. याप्रकरणी बली आणि त्याच्या दोन साथीदारांविरूद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिंक्य जिम ट्रेनर असून ते क्रीडा महर्षी बाबूलाल प्रेमलाल झवर क्रीडा संकुल व्यायामशाळेत तरुणांना व्यायामाचे धडे देतात. दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी 7.15 वाजण्याच्या सुमारास अजिंक्य तरुणांना व्यायाम शिकवित होते. त्यावेळी बली हा बेंचवर बसला होत. अजिंक्य यांनी त्याला खुर्चीवर बसण्यास सांगितले. त्याचा राग आल्यामुळे बलीने अजिंक्यला शिवीगाळ केली. त्यानंतर दोन साथीदारांच्या मदतीने अजिंक्यच्या डोक्यात रॉड मारुन त्यांना जखमी केले. याप्रकरणी पोलीस हवालदार खंडाळे तपास करीत आहेत.