Breaking News

पुणे- केवायसी अपडेटच्या बहाण्याने ज्येष्ठाला गंडा मुंबई

पेटीएम कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करुन केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने ज्येष्ठाला 1 लाख 50 हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी अशोक अगरवाल (वय 65, रा. वाकडेवाडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्याने अशोक यांना फोन करुन पेटीएम कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने डेबीट व क्रेडिट कार्डची केवायसी अपडेट करण्याची बतावणी केली.

त्यानुसार मोबाईलवरील ओटीपी घेउन अशोक यांच्या क्रेडीट खात्यातून 1 लाख 50 हजार रुपये स्वतःच्या बँकखात्यात वर्ग करून घेतले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक शफिल पठाण तपास करीत आहेत.